Emotional Father : गणित हा असा विषय आहे, ज्याची अनेक विद्यार्थ्यांना आवड कमी पण भीतीच जास्त वाटत असते. होय, बहुतेक विद्यार्थी गणिताच्या विषयाकडे टेन्शन म्हणून पाहतात. त्यामुळेच या विषयाचे कोचिंग घेणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि हो…भारतातच नाही तर इतर देशांतही गणितात ‘डब्बा गुल’ असणारे विद्यार्थी आहेत. याचं ताजं उदाहरण चीनमधलं आहे, जिथे एका वडिलांनी आपल्या मुलाला गणित विषयासाठी वर्षभर शिकवलं. परिक्षेचा निकाल लागल्यानंतर त्याचे गणितातले मार्क्स पाहून वडील अक्षरशः ढसाढसा रडू लागले. याचं कारण काय ते जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

हा व्हायरल व्हिडीओ ‘विरडकाया’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हे प्रकरण चीनच्या हेनान प्रांतातील झेंगझोऊ इथलं आहे. इथे राहणाऱ्या वडिलांनी त्यांच्या मुलाला गणितात उत्तम मार्क्स मिळावे म्हणून मुलासोबत त्यांनीही बरीच मेहनत घेतली. वर्षभर मुलाला त्यांनी जीव तोडून शिकवलं. २३ जून रोजी राहणाऱ्या व्यक्तीच्या मुलाचा निकाल लागला. त्याला गणितात १०० पैकी ६ गुण मिळाले. वडिलांनी निकाल पाहिल्यावर ते खूप दुःखी झाले. वर्षभर मुलाला शिकवून सुद्धा परिक्षेत त्याला १०० पैकी फक्त सहाच गुण मिळालेले पाहून शेवटी वडिलांना रडू आवरलं नाही. आपल्या हातांनी डोळ्यातील अश्रु पुसत ढसाढसा रडताना दिसून आले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : धाडसी पोलीस अधिकाऱ्याने जीवाची पर्वा न करता दलदलीत अडकलेल्या माणसाचा जीव वाचवला!

‘किलू इव्हनिंग न्यूज’ने चीनचे ट्विटर म्हणून ओळख असलेल्या ‘वेइबो’वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. निकाल बघून वडील रडत रडत म्हणतात, “माझ्या मुलाला गणिताच्या परीक्षेत १०० पैकी फक्त ६ गुण मिळाले आहेत. मला आता त्याची पर्वा नाही, माझी मेहनत व्यर्थ गेली, त्याला स्वतःलाच लढू दे!”

आणखी वाचा : हा VIRAL VIDEO तुम्हाला बालपणीच्या आठवणीत घेऊन जाईल, एकाच छत्रीत मित्रांना एकत्र बघून तुम्हीही भारावून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : देसी ढोलाच्या तालावर थिरकले विदेशी नागरिक, जबरदस्त डान्सचा हा VIRAL VIDEO पाहा

मुलाचे वडील त्याला खूप शिकवत होते. पण त्याचा खराब निकाल पाहून तो इतका निराश झाला की तो रडू लागला. मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्याला मागील परीक्षांमध्ये ४०-५० ते ८०-९० गुण मिळाले होते. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. काही युजर्स वडिलांवर टीका करत आहेत, तर अनेकांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. एका यूजरने म्हटले की, ‘रोज मध्यरात्रीपर्यंत मुलाला शिकवणे ठीक आहे. परंतु मुलाला त्याच्या मानसिक स्थितीसाठी आणि त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी भरपूर विश्रांतीची आवश्यकता आहे. या विषयावर तुमचे काय म्हणणे आहे?” असं देखील विचारण्यात येत आहे.