Vada Pav Girl Viral Video: वडापाव विकणारी चंद्रिका दीक्षित गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. सुरुवातीला जरी ती वडपाव विकण्यासाठी चर्चेत आली असली आता मात्र ती वेगवगेळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कधी ती ग्राहकांशी उद्धटपणे बोलताना दिसते, कधी ग्राहकांना रांग मोडू नका म्हणून ओरडताना दिसते. कधी व्हिडीओमध्ये स्टॉल हटवण्यास सांगितल्यामुळे रडताना दिसते तर कधी एका महिलेसह भांडताना दिसते. दरम्यान आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये वडापाव गर्ल चंद्रिका दिक्षीतला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचा दावा करण्यात आला आहे.

ही घटना काल ३० एप्रिल रोजी प्रितमपुरा परिसरामध्ये घडल्याचे समजते. हा व्हिडिओ ‘प्याराबेटा’ (‘PyaraBetaa) या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला असून, “ब्रेकिंग वडापाव पार्ट ५, वडापाव विकणाऱ्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ अकरा हजार वेळा पाहिली गेला आहे. सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

274 Palestinians killed in Israeli attack
इस्रायलच्या हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार; हमासच्या ताब्यातील ४ ओलिसांची सुटका करण्यात यश
bogus cotton seeds sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर: बाेगस कापूस बियाण्यांची विक्री; गंगापूरमध्ये गुन्हा
prajwal revanna
महिन्याभरानंतर भारतात परतलेल्या प्रज्वलला विमानतळावरच अटक, व्हिडिओतील आवाजाचे नमुने गोळा करणार?
Dhruv Rathi
युट्यूबर ध्रुव राठीला जीवे मारण्याची धमकी; एक्स पोस्टवर म्हणाला, “या सगळ्यामागे…”
man shoots dj oprator in ranchi,
धक्कादायक! मद्य न दिल्याने थेट बारमधील डीजे ऑपरेटरच्या छातीत झाडल्या गोळ्या; जागीच मृत्यू
Tourist couple shot by terrorists in Kashmir
काश्मीरमध्ये पर्यटक जोडप्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जखमी महिलेने सांगितला घटनेचा थरार, मोदींकडे केली ‘ही’ विनंती
What Sharad Pawar Said?
“शिवसेनेला भाजपाबरोबर जाण्यापासून २०१४ मध्येच रोखायचं होतं पण..”, शरद पवारांचा गौप्यस्फोट
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा

हेही वाचा – “ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral

दरम्यान, Dynamite News नावाच्या वृतसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडीओनुसार, आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त चंद्रिका दिक्षीत हिने रस्त्यावर भंडारा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गजबजलेल्या रस्त्यावर अशा कार्यक्रमाला स्थानिक लोकांनी विरोध केला ज्यामुळे वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांना चंद्रिका दीक्षितला अटक केली आहे. “अशी माहिती समोर आली आहे. अद्याप दिल्ली पोलिसांकडून अशी माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच व्हायरल झाला आणि लोकांकडून सर्व प्रकारच्या कमेंट्स आल्या. बहुतेकांनी दिल्ली पोलिसांच्या या निर्णयाचे समर्थन केले, तर बाकीच्यांनी तिला ‘सतत गोंधळ घालते’ म्हटले. काहींनी तिला ‘मुद्दाम सर्वांचे लक्ष वेधून घेते’ असेही म्हटले.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करताना एकाने उपहात्मकपणे लिहिले की, “मायावतीजी यांनी तिला अटक करण्यास भाग पाडले आहे”

दुसरा म्हटला की, “अर्थात तिला अखेर अटक झाली आहे. शेवटी, हे सर्व तिचे नाटक आहे. तिच्याबरोबर नेहमीच काही ना काही गोष्ट घडते. तीच वादग्रस्त विषय तयार करते, तिच्या प्रसिद्धीचे मूळ कारण वडापाव नाही,” दुसऱ्या व्यक्तीने लिहिले.

हेही वाचा – बापरे! मुंबई विमानतळावर ३३३ रुपयांना विकली जाते पाणीपुरी, व्हायरल फोटो पाहून नेटकरी चक्रावले

“अशा प्रकारची अस्वच्छता जास्त काळ मनोरुग्ण वॉर्डमध्ये राहण्यास पात्र आहे,” तिसऱ्या व्यक्तीने सांगितले. “शाब्बास, एक अत्यंत आवश्यक निर्णय. ती दर इतर दिवशी खूप गोंधळ निर्माण करत होती. ती नेहमीच लोकबरोबर भांडायची आणि दररोज असे वाद निर्माण करायचे. मी तिच्या अटकेचे पूर्णपणे समर्थन करतो,” चौथ्या वापरकर्त्याने लिहिले की, “ती नेहमीच तिची का चर्चेतअसते आणि ती कधीच विकत असलेला वडापाव का चर्चेत नसतो? त्याच मुलीमध्ये काहीतरी चूक आहे,” पाचव्या व्यक्तीमध्ये आपले मत व्यक्त केले.