Viral Video: जंगलातील प्रत्येक सजीव एकमेकांशी अन्नाच्या माध्यमातून जोडलेला असतो. यालाच जंगलाचे भूक चक्र किंवा अन्नसाखळी म्हणतात. जंगलात झाडे, गवत आणि विविध वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करतात. या वनस्पतींवर हरिण, ससा, हत्ती, माकड यांसारखे शाकाहारी प्राणी अवलंबून असतात. त्यानंतर वाघ, सिंह, बिबट्या, लांडगा यांसारखे मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. मृत प्राणी आणि वनस्पतींचे विघटन सूक्ष्मजीव करतात आणि त्यातून पोषकद्रव्ये पुन्हा जमिनीत मिसळतात. त्यामुळे झाडांना पुन्हा पोषण मिळते आणि हे चक्र सतत सुरू राहते.
जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागविण्यासाठी संघर्ष करीत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो. त्याचप्रमाणे हिंस्र प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांना ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, तोही आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतं. त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांतानं शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते; तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक काही सिंह म्हशीवर हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसत आहे.
समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिंह एका झेब्र्याची शिकार करण्यासाठी जंगलात वायुवेगाने धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये जंगलातील शिकारीचा थरारक प्रसंग पाहायला मिळत आहे. सिंहांचा कळप एका म्हशीचा पाठलाग करताना दिसत असून, काही वेळ तिचा पाठलाग केल्यानंतर अखेर सिंह म्हशीवर हल्ला करताना दिसतात. शिकारीच्या या प्रसंगातून जंगलातील अन्नसाखळी आणि जगण्यासाठीची धडपड स्पष्टपणे पाहायला मिळते.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ युट्यूबवरील @AnimalsaroundtheWorld2
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “जिल्हा परिषद शाळेत कोण कोण शिकले आहे..” एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम खूप च सुंदर सदैव यशस्वी हो बाळा” आणखी एका युजरने लिहिलेय, “वा.. बाळा.. छान.. बॅलन्स छान सांभाळला… अभिनंदन…”
