सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर केले जात आहेत. त्यातले काही इतके मजेशीर आहेत की ते पाहून हसू आवरता येत नाही. तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. काही व्हिडीओंवर लोकांना विश्वास ठेवणं अवघड जातं. अशाच एका लग्नाचा अनोखा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

अनेकदा लग्नाच्या व्हिडीओमध्ये नववधूची पाठवणीची वेळ ही भावूक करणारी असते. यावेळी नवरीची पाठवणी पाहूनच कुणाच्याही डोळ्यात अश्रु येतात. तिच्या माहेरच्या घरातून निघताना तिच्या कुटुंबीयांना निरोप देताना नवरीचे डोळे अश्रुंनी भरलेले असतात. पण हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. कारण या व्हिडीओमध्ये नवरी नव्हे तर नवदेवच रडताना दिसला. लग्नात पाठवणीच्या वेळी नवरीऐवजी नवरदेवच रडताना पाहून आजूबाजूला उपस्थित वऱ्हाडी मंडळींना देखील हसू आवरता आलं नाही. खरं तर, लग्नाच पाठवणीच्या वेळी नवरदेव आनंदी दिसून येतो आणि पण इथे हा नवरदेव ढसढसा रडू लागला. यावेळी नवरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : उष्णतेच्या लाटेवर बिहारी टीचरने गायलेलं हे गाणं एकदा ऐकाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कधी कासवांना तुम्ही पकडापकडी खेळताना पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

नवरदेवाला रडताना पाहून सुरूवातीला नवरी आणि तिच्या नातेवाईकांना क्षणभर धक्का बसतो. मात्र, नंतर हे प्रकरण समजल्यानंतर सर्वांना आपलं हसू आवरता आलं नाही. या व्हिडीओमध्ये पाठवणीच्या वेळी नवरीबाई मात्र अजिबात रडत नव्हती. उलट ती हसताना दिसत आहे. नवरी-नवरदेवाचा हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर thebridesofindia नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला दोन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत.