scorecardresearch

वऱ्हाडासाठी बुक केले संपूर्ण विमान; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं

नातेवाईकांबरोबर लग्नाला जाण्यासाठी संपुर्ण विमान बुक केल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे

वऱ्हाडासाठी बुक केले संपूर्ण विमान; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं
लग्नासाठी जाणाऱ्या या वऱ्हाडी मंडळींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू आहे. ज्या घरात लग्न असते तिथे उत्साहाचे वातावरण असते. लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटणे, लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, ते कार्यक्रम सर्वांपेक्षा वेगळे करण्याच्या हटके कल्पना, कपड्यांची खरेदी, प्री वेडिंग फोटोशूट अशा सर्व गोंष्टींची धमाल लग्नात असते. या सर्व प्रसंगांमध्ये आपले सर्व जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आपल्या आनंदात सहभागी व्हावेत असे प्रत्येक जोडप्याला वाटते. त्यासाठी सर्वांना सोयीस्कर असेल असे ठिकाण, तारीख असे सर्व नियोजन केले जाते. अशाच एका नियोजनाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लग्नातील वऱ्हाडी मंडळींसाठी चक्क संपूर्ण विमानाचे बुकिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ श्रेया शाह या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘बहिणीच्या लग्नासाठी संपूर्ण विमान बुक केले आहे’ असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये विमानात बसलेली वऱ्हाडीही दिसत आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला ९९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 17:09 IST

संबंधित बातम्या