viral video mother father dance on daughter haldi : लग्नाला नाही बोलावलं तरी चालेल. पण, हळदीला नक्की बोलावं असं अनेकजण गंमतीने म्हणतात. लग्नाच्या आदल्या दिवशी होणारा हळदीचा कार्यक्रम आजकाल खूपच खास आणि धमाल स्वरूपाचा असतो. या कार्यक्रमात मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी आणि घरातील सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. हळद लावणे, डीजेच्या तालावर नाचणे आणि अगदी आवडत्या बिर्याणीवर ताव मारणे अशा सगळ्या गोष्टींमुळे वातावरण अगदी आनंदी आणि उत्साही होतं. त्यामुळे हळदीचा कार्यक्रम हा फक्त एक विधी नसून, तो लग्नसोहळ्याची सुरुवात करणारा एक रंगतदार सोहळा मनाला जातो.
सध्या एक जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये नवरीचे आई-बाबा हळदीत “गल्यान सांखली सोन्याची, ही पोरी कोनाची” या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. अगदी मनासारखा जावई भेटल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसतो आहे. एवढेच नाही तर गाण्याच्या तालावर अगदी ठेका देत हे जोडपं अगदी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत, जे पाहून जमलेली मंडळीही या जोडप्याचा व्हिडीओ शूट करत तर अनेक जण त्यांच्याकडे बघून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
हळदीच्या या कार्यक्रमात प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आनंद घेतो. काही लोक सगळ्यांबरोबर मिळून मनसोक्त नाचतात, तर काही जण अगदी उत्तम आणि लक्षवेधी डान्स सादर करतात. काही जण मात्र स्वतःच्या आनंदात, शांतपणे किंवा थोडेसे एकटेही मजा घेताना दिसतात. तर काही मंडळी आपल्या डान्स पार्टनरसोबत मिळून नाचतात आणि तो क्षण अधिक खास बनवतात. त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमात प्रत्येकाचं एक वेगळं, अनोखं आणि मजेशीर रूप पाहायला मिळतं.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thesoulfulpair_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “मनासारखा जावई भेटल्यावर माझे आई-बाबा” ; अशी कॅप्शन लेकीने व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी देखील व्हिडीओ पाहून त्यांचा आनंद व्यक्त करत “आनंद शिखरावर आहे”, “एक नंबर काका आणि काकी”, “बेस्ट डान्सर” ; आदी अनेकविध कमेंट्स तर काही जण इमोजीसह या दोघांच्या डान्सचे कौतुक करताना दिसून आले आहेत.
