“मणिके मागे हिथे…” या गाण्याची क्रेझ अजूनही कायम आहे. हे गाणं एका श्रीलंकन गायिकेनं गायलं आहे. योहानी डिलोका डिसिल्वा असं या गायिकेचं नाव आहे. या गाण्याला कमालीची लोकप्रियता मिळत असून बॉलिवूडकरांपासून ते अगदी मराठी कलाविश्वापर्यंत आणि इतरही सर्वसामान्यांपर्यंतही सर्वांमध्येच या गाण्याची भुरळ पाहायला मिळत आहे. तामिळ भाषेतील वाटणाऱ्या या गाण्याची मूळ भाषा सिंहली आहे. अनेक सेलेब्रिटींनीही या गाण्याचे कौतुक केले आहे. जगाला वेड लावणाऱ्या गाण्याची देशभर अनेक भाषांतील व्हर्जन्स निघाली आहेत. या गाण्यावर नृत्य केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

माझ्या हृदयात असणारा प्रत्येक उत्कट भाव हा तुझाच आहे, असा या गाण्याचा अर्थ आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या हंगामात अनेक नवविवाहित जोडपे आणि नातेवाईक सिंहली गाण्यावर नाचण्याचा पर्याय निवडत आहेत. या गाण्यावर एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कपल या गाण्यावर थिकरताना दिसतील. डॉ. मीनल मक्कर यांनी तिच्या पतीसोबत डान्स केला. या नृत्याला नेटकरी पसंती देत आहेत.

या गाण्याला सोशल मीडियावर हजाराहून अधिक व्हूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट्स करत नृत्याचं कौतुक केलं.