Couple Dance On Reception : सध्या कोणताही कार्यक्रम असो, डान्सशिवाय तो पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. लग्नसमारंभ, वाढदिवस, साखरपुडा किंवा इतर कोणताही खास सोहळा असो, संगीताच्या तालावर थिरकण्याचा उत्साह सर्वांमध्ये पाहायला मिळतो. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तर तेच बघून अशा कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी केली जाते. तर सध्या, नुकतेच लग्न झालेल्या एका जोडप्याने एका गाण्यावर अतिशय सुंदर डान्स केला आहे.

गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती यांचं गावरान मराठमोळ गाणं ‘नखरेवाली’ आपल्यातील प्रत्येकाने एकदा तरी ऐकलं असेलच. या गाण्याच्या ओळी आणि हूकस्टेप अगदी मनात बसणाऱ्या आहेतच. शिवाय हे गाण ऐकल्यावर पाय आपोआप थिरकायला देखील लागतात. तर सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नव्या नवरा-नवरीने सुद्धा ‘नखरेवाली’ गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. त्यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीबरोबरच दोघांच्या प्रत्येक डान्स स्टेप्स इतक्या सुंदर आहेत की, तुमची नजर त्यांच्यावरून हटणार नाही, एवढं मात्र नक्की!

ते म्हणतात ना, कुंडली जुळली नाही तरी चालेल, पण वाईब मात्र जुळली पाहिजे! या जोडप्याच्या डान्समध्येही अगदी तसंच काहीसं पाहायला मिळालं. गाण्याच्या प्रत्येक ओळीवर त्यांनी केलेल्या सुंदर स्टेप्स अगदी उठून दिसत होत्या. त्यांचे टायमिंग, हावभाव आणि एकमेकांसोबतची केमिस्ट्री इतकी अप्रतिम जुळली होती की, दोघांची वाईब अगदी एकसारखी वाटत होती. नुकतंच लग्न झालेल्या नवरा-नवरीचा डान्स व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

वर्तिका आणि सुमीत असे या जोडप्याचे नाव आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @surendraa__radhikaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘नखरेवाली’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून जोडप्याचे कौतुक वेगवेगळ्या इमोजीद्वारे करताना दिसून आले आहेत.