Viral Video couple receive surprise from house help : घरकाम इतर सर्व कामांप्रमाणेच एक प्रकारचे काम आहे. घरकाम करणाऱ्या महिला, तरुणी दुसऱ्यांच्या घरी स्वतःच घर असल्यासारखं काम करतात. भांडी घासणे, लादी पुसणे, कपडे धुणे, घर स्वच्छ ठेवणे ते घरातील लहान बाळांना आईसारखी माया करणे हे फक्त त्यांनाच जमते. तर याबदलत्यात आपणही त्यांना आपुलकी व जिव्हाळा दाखवला पाहिजे. तर आज सोशल मीडियावर अशाच एका घरकाम करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हीही भारावून जाल…

बंबंगळुरूमधील एका घरकाम करणाऱ्या महिलेने आपल्या मालकांना लग्नाच्या वाढदिवसाला जबरदस्त सरप्राईज दिले आहे. नेहा हरचंदानी यांची घरकाम करणाऱ्या महिलेसमोर सहज बोलता बोलता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा उल्लेख केला होता. तो लक्षात ठेवला जाईल किंवा साजरा केला जाईल अशी त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. पण, हा खास प्रसंग खास करायचा असा तिचा निर्धार पक्का होता.

घरकाम करणार महिला काही भेटवस्तू घेऊन आत आली. यादरम्यान ती प्रचंड लाजत होती. तेव्हा हरचंदानी तिला विचारताना ऐकू येते, “दीदी, आज तुम्ही हे का घेऊन आलात?” त्यावर ती हसून आणि किंचित लाजत उत्तर तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे असे सांगते. जेव्हा तिच्या लक्षात येते, तेव्हा हरचंदानी पुढे म्हणते, “यार दीदी, किती क्यूट आहात तुम्ही” असे मालकीण म्हणते.

व्हिडीओ नक्की बघा…

त्यानंतर घर मालकांना पुढे बोलावून त्यांच्या हातात गुलाब आणि चॉकलेट देते. हे गुलाब आणि चॉकलेट घरकाम करणाऱ्या महिलेने तिच्या नवऱ्याच्या मदतीने ब्लिंकिंटवरून ऑर्डर केले होतं. त्यानंतर घरमालक जोडप्याने तिच्या पायांना स्पर्श करून “दीदी, फक्त तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच कायम असूदेत” ; असं अगदी आपुलकीने म्हणतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nehaaaa_unfiltered या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “दीदीमध्ये माणुसकी आणि प्रेम आहे”, “घर मालकाने तिच्या पायांना स्पर्श केला हे पाहून खूप बरं वाटलं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…