scorecardresearch

गाईने केला चक्क मॉलमध्ये प्रवेश; ग्राहकांची उडाली तारांबळ, पाहा मजेशीर Video

Viral Video: गाईने मॉलमध्ये प्रवेश करताच काय घडले पाहा

गाईने केला चक्क मॉलमध्ये प्रवेश; ग्राहकांची उडाली तारांबळ, पाहा मजेशीर Video
गाईचा मॉलमधील फेरफटका मारतानाचा व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

मॉलमध्ये शॉपिंग करायला जायला आपल्या सर्वांनाच आवडते. एकाच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वस्तुंची खरेदी करायला मिळते, आवडते खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो, चित्रपट पाहता येतो. या आणि अशा बऱ्याच सगळ्या गोष्टींमुळे मॉलमध्ये खरेदी करणे, फिरणे अनेकांना आवडते. पण मॉलमध्ये फिरत असताना अचानक तुम्हाला तिथे प्राणी दिसले तर? तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. असाच काहीसा प्रकार आसाममधल्या एका मॉलमध्ये घडला ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये चक्क एक गाय मॉलमध्ये फेरफटका मारत असल्याचे दिसत आहे. एका कपड्याच्या दुकानात गाईने प्रवेश करताच तिथे असणाऱ्यांना ग्राहकांची आणि विक्रेत्यांची कशी तारांबळ उडाली पाहा.

आणखी वाचा- Video: पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करताना घडली जन्माची अद्दल; नेमकं काय झालं पाहा

व्हायरल व्हिडीओ:

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला असुन, या हास्यास्पद प्रकाराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 19:27 IST

संबंधित बातम्या