Viral Video Cow Poops in ATM Man Comes to withdraw money sees the shocking event | Loksatta

Video: ATM ला गोठा समजली गाय, शेण सारवून राखत बसली; इतक्यात एक माणूस आला अन..

Viral Video: ATM ला चक्क गोठा समजून या गायीने जे शेण पसरवून ठेवलं ते बघून नेटकरी अवाक झाले आहेत, बरं हा व्हिडीओ इथवरच थांबत नाही..

Video: ATM ला गोठा समजली गाय, शेण सारवून राखत बसली; इतक्यात एक माणूस आला अन..
Viral Video Cow Poops in ATM (फोटो: ट्विटर)

Trending News: जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही एखादी गोष्ट घडली तर ती काही सेकंदात सोशल मीडियावर झळकते आणि जगभर पसरते. आणि जर त्यात काही अगदी विचित्र असेल तर त्याला व्हायरल होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. असाच एका गायीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत नाही. एका एटीएमच्या केबिनला चक्क गोठा समजून या गायीने जे शेण पसरवून ठेवलं ते बघून नेटकरी अवाक झाले आहेत, बरं हा व्हिडीओ इथवरच थांबत नाही तर पुढे जेव्हा या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी एक व्यक्ती येते तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहून तर नेटकरी अगदी लोटपोट झाले आहेत. एटीएम मधील कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला असून आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता ही एक अगदी सामान्य वाटावी अशी एटीएम केबिन आहे, पण काही क्षणात एक निरागस गोमाता इथे असं काही करते की तुम्ही बघतच बसाल. कदाचित बाहेर उकडत असावं म्हणून एक गाय एटीएमच्या एसीची हवा खाण्यासाठी आत येते व हळूहळू यालाच आपले घर बनवते. एटीएममध्ये आधी निवांत बसलेली गाय काही क्षणात चक्क शेणाने अक्ख्या एटीएमला सारवून टाकते. बरं तिच्यासाठी हे काही वेगळं नसल्याने तिथेच बसून राहते.

…अन भाजप खासदार हाताने शौचालय घासू लागले; नेमकी का आली एवढी वेळ? पाहा Viral Video

इतक्यात एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी येतो, गायीला व नंतर शेणाने सारवलेल्या या एटीएमला बघून हा बापडा बिचारा पुरता हादरतो पण कदाचित त्याला इतकी घाई असावी की नाक बंद करून तो एटीएममधून पैसे काढतोच, या सर्व प्रकारात गाय मात्र निवांत बसून मज्जा घेताना दिसतेय. या व्यक्तीसह आलेल्या त्याच्या पुतण्याने हा व्हिडीओ शूट करून शेअर केला होता.

गायीने शेणाने सारावलं ATM

Video:”माझे बाबा पोलीस, तुम्हाला”…चिमुरड्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला असा भरला दम, थेट धमकी देत म्हणाला

दरम्यान हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील रिवा येथील नवीगढी येथील असल्याचे समजत आहे. काहींना तर शेणाचे प्रमाण पाहता या गायीचं पोट बिघडल्याचीही चिंता वाटत आहे. तर इतकं सगळं होईपर्यंत एटीएममध्ये वॉचमन नव्हता का असाही प्रश्न अनेकांनी केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘मैने पायल है छनकाई’ गाण्यावर महिलेने असा ताल धरला की…तुम्हालाही थिरकण्याचा मोह आवरणार नाही

संबंधित बातम्या

Video: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन् तेवढ्यात…
Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत
Video: टॉवेल गुंडाळून ‘तो’ थेट मेट्रोत शिरला; आत जाताच असं काही केलं की मुलींनी तोंडच लपवली
Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
वेड्या बहिणीची वेडी माया! धाकट्या बहिणीला पाहून मोठ्या बहिणीनं काय केलं पाहा? Viral Video पाहून आनंदाश्रू तरळतील

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द