Viral Video: हल्ली सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक मजेशीर आणि निरागस व्हिडीओ सतत व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या गोंडस हालचाली, भन्नाट प्रतिक्रिया आणि बोबड्या बोलण्यामुळे हे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. काही मुलं डान्स, अभिनय किंवा आपल्या अनोख्या अंदाजातून अशी काही धमाल करतात की त्यांचे व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही.
शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, वार्षिक समारंभात केलेला डान्स नेहमीच आपल्या स्मरणात असतो. सध्या एका अंगवाडीतील विद्यार्थ्याचा असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय.
आजकाल सोशल मीडियामुळे गावाकडील शाळांमधील लहान मुलांचे गोड आणि मजेशीर व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओमध्ये चिमुकले विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारताना, निरागसपणे प्रश्न विचारताना आणि आपल्या खास अंदाजात उत्तरं देताना दिसतात. मुलांचे बोबडे बोल, निरागस प्रश्न आणि शिक्षकांसोबतचा हा गोड संवाद नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो.
आता असाच एक गोड व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक चिमुकला आपल्या शिक्षिकेसोबत अगदी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहे. शिक्षिका त्याच्याशी संवाद साधताना दिसते, तर चिमुकलाही आपल्या निरागस अंदाजात तिच्या प्रश्नांना उत्तरं देतो. या दोघांमधील हा गोड संवाद पाहून नेटकऱ्यांचेही लक्ष वेधले जात आहे. त्यांचे हा मजेशीर संवाद पाहण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @chulbul_aganwadi या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “आवो आम्ही आता गरीब झालोय म्हणून ड्रॅगन फ्रुट, केळी, संत्री, अँपल खातोय तुमच्या सारखे श्रीमंत थोडीच आहे खारी, पाव , ब्रेड खायाला” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “दादा कोंडके नंतर हाच प्रसिद्ध होणार बहुतेक”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “पोरग लय हुशार आहे भाऊ”
