Viral Video: हल्लीची लहान मुलं अभ्यासासोबतच वेगवेगळ्या कलांमध्येही आपली कल्पकता दाखवताना दिसतात. नृत्य, चित्रकला, अभिनय, गायन, हस्तकला किंवा सोशल मीडियावरील भन्नाट प्रयोग अशा विविध माध्यमातून त्यांच्या अंगी असलेली क्रिएटिव्हिटी समोर येते. एखादी गोष्ट इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्याची त्यांची कल्पना आणि आत्मविश्वास अनेकदा कौतुकास्पद असतो. विशेष म्हणजे सोशल मीडियामुळे या चिमुकल्यांच्या कलांना मोठे व्यासपीठ मिळाले असून, त्यांचे छोटे-छोटे प्रयोग आणि टॅलेंट काही क्षणांत अनेकांपर्यंत पोहोचत आहे.

सोशल मीडियामुळे अनेकांना अभिनयाची कला रिल्सच्या माध्यमातून लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळत आहे. पूर्वी अभिनय करण्यासाठी मोठ्या व्यासपीठाची किंवा संधीची गरज असायची; मात्र आता मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या मदतीने घरबसल्या अभिनयाचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करता येतात. संवादफेक, हावभाव, विनोदी प्रसंग किंवा चित्रपटांतील दृश्यांची नक्कल अशा विविध प्रकारातून अनेक जण आपली कला दाखवत आहेत. काही रिल्सना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने या माध्यमातून नव्या कलाकारांना आपली ओळख निर्माण करण्याची संधीही मिळत आहे.

गणपती उत्सवानिमित्त सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या रिल्स पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पांच्या गाण्यांवर डान्स, पारंपरिक वेशभूषा, आरती, सजावट तसेच बाप्पांच्या आगमनाचे आणि विसर्जनाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करून अनेकजण रिल्सच्या माध्यमातून शेअर करत आहेत. काही जण आपल्या कुटुंबीयांसोबत तर काही मित्र-मैत्रिणींसोबत उत्साहात व्हिडीओ बनवत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली गणपतीच्या गाण्यावर सुंदर हावभाव आणि अभिनय करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर तिचे एक्स्प्रेशन्स आणि आत्मविश्वास पाहून नेटकऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे. तिच्या निरागस अभिनयाला सोशल मीडिया यूजर्सकडूनही चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Prisha Pachange (@its_prishuu_pachange_57)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @its_prishuu_pachange_57 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गं गोड आहे ही” एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम खूप च सुंदर सदैव यशस्वी हो बाळा” आणखी एका युजरने लिहिलेय, “वा.. बाळा.. छान”