Viral Video: हल्लीची लहान मुलंही आपल्या कलागुणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. पूर्वी एखाद्या मुलाला नृत्य, गायन, अभिनय किंवा चित्रकलेची आवड असेल तर त्याला आपली कला सादर करण्यासाठी मर्यादित संधी मिळायची; मात्र आता सोशल मीडियामुळे लहान कलाकारांना आपली कला मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य झाले आहे. अनेक चिमुकले अगदी कमी वयातच डान्स, गाणे, अभिनय, वादन अशा विविध कला आत्मसात करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या निरागसपणासोबतच आत्मविश्वास आणि कलाकौशल्य पाहून नेटकरीही कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. काही मुलांच्या डान्समधील अचूक स्टेप्स, अभिनयातील हावभाव किंवा गाण्यातील सुरेल आवाज पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते. पालकही मुलांच्या आवडीला प्रोत्साहन देत त्यांचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे अनेक चिमुकल्या कलाकारांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे. सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता या छोट्या कलाकारांसाठी आपली प्रतिभा दाखवण्याचे एक मोठे व्यासपीठ ठरत आहे.

पावसाळा आला की वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. आकाशात दाटून आलेले काळे ढग, बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि हिरवाईने नटलेला निसर्ग मनाला मोहून टाकतो. अशा वातावरणात पावसावर आधारित गाणी ऐकण्याची मजा काही औरच असते. ‘बरसो रे मेघा’ हे गाणंही पावसाळ्याच्या या सुंदर वातावरणाशी अगदी जुळून येतं. पावसाच्या सरींमध्ये हे गाणं ऐकताना अनेकांना मनसोक्त नाचण्याचा किंवा पावसाचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे पावसाळ्यात ‘बरसो रे मेघा’सारख्या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा सुंदर डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली ‘बरसो रे मेघा’ या गाण्यावर अतिशय सुंदर आणि मनमोहक डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर ती उत्स्फूर्तपणे डान्सच्या स्टेप्स करत असून तिच्या निरागस हावभावांनी हा व्हिडीओ आणखीनच खास बनला आहे. तिचा आत्मविश्वास, डान्समधील सहजता आणि गोंडस अंदाज पाहून नेटकऱ्यांचेही लक्ष तिच्याकडे वेधले जात आहे. पावसाळ्याच्या वातावरणाशी अगदी साजेसा हा डान्स व्हिडीओ पाहून अनेकांना बालपणीच्या पावसातील आठवणीही नक्कीच ताज्या होतील.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Adriti Nayek (@adritinayek)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adritinayek या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “अय्या किती गोड” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स बाळा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “देसी कलाकार”