Viral Video: हल्लीची लहान मुलंही सोशल मीडियामुळे डान्सकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसतात. ट्रेंडिंग गाणी, रील्स आणि चित्रपटांतील डान्स स्टेप्स पाहून अनेक चिमुकले अगदी सहजपणे त्या स्टेप्सची नक्कल करतात. त्यांच्या निरागस आणि उत्स्फूर्त डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
सोशल मीडियावर सध्या विविध सणांच्या निमित्ताने ट्रेंडिंग व्हिडीओंची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सणाचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा, गाणी, डान्स आणि हटके अंदाजातील व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अनेक जण सणानिमित्त खास रील्स तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात आणि हे व्हिडीओ काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर विविध व्हिडीओंची रेलचेल पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचे व्हिडीओ, सजावट, आरती आणि भक्तीगीतांसोबतच डान्सचे व्हिडीओही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक जण गणपतीच्या गाण्यांवर उत्साहात डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. लहान मुलांपासून तरुण-तरुणींपर्यंत अनेकांचे डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
एका चिमुकलीने साडी नेसून बाप्पाच्या ‘चक चक सोन्याचा’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. साडीतील तिचा गोंडस अंदाज आणि गाण्याच्या तालावर केलेल्या डान्स स्टेप्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात या चिमुकलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @soumyabhosale_01 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच क्यूट गं” एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर डान्स केला पोरीने” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी डान्स”
