Viral Video: हल्लीची लहान मुलं अभ्यासासोबतच आपल्या कलागुणांनीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसतात. सोशल मीडियामुळे तर या चिमुकल्यांना आपली कला मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. कुणी अप्रतिम गाणं गातं, कुणी भन्नाट डान्स करतं, तर कुणी अभिनय, चित्रकला, वादन किंवा विनोदी अंदाजातून आपली वेगळी छाप पाडतं. विशेष म्हणजे अनेक मुलांमध्ये अगदी कमी वयातच आत्मविश्वास, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलता दिसून येते. घरातील मोठ्यांचे अनुकरण करताना किंवा शाळेतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना त्यांच्यातील कलागुण अधिक खुलून येतात. काही मुलांचे निरागस हावभाव, संवादफेक आणि अभिनय पाहून मोठ्यांनाही आश्चर्य वाटते. सोशल मीडियावर अशा चिमुकल्यांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात कौतुकही मिळते.
सोशल मीडिया हे आज कलाकारांसाठी केवळ मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाही, तर आपल्या कलेला व्यासपीठ मिळवून देणारं महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. पूर्वी एखाद्या कलाकाराला मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी टेलिव्हिजन, चित्रपट, स्टेज शो किंवा इतर पारंपरिक माध्यमांची गरज भासत असे; मात्र आता सोशल मीडियामुळे कोणालाही आपल्या घरातूनच कला सादर करता येते. गाणं, नृत्य, अभिनय, वादन, चित्रकला, विनोदी कला किंवा इतर कोणताही कलागुण असो, उत्तम सादरीकरण असेल तर तो काही क्षणांत हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील आणि लहान शहरांमधील कलाकारांना सोशल मीडियामुळे आपली प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे. अनेकदा साध्या मोबाईल कॅमेऱ्यातून शूट केलेले व्हिडीओही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि कलाकारांना नवी ओळख मिळते. त्यामुळे ज्यांना पारंपरिक माध्यमांमध्ये संधी मिळत नाही, अशा कलाकारांसाठी सोशल मीडिया हे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा गोड व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली ‘एक दो तीन’ या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर तिचे हावभाव, डान्स स्टेप्स आणि आत्मविश्वास पाहून नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं जात आहे. अगदी लहान वयातही तिच्यातील नृत्याची आवड आणि उत्साह पाहायला मिळत असून, तिच्या निरागस अंदाजाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तिचा डान्स पाहून अनेकजण तिच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
A post shared by Nrityakala Dance Academy (@nrityakala_2020)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nrityakala_2020 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स बाा” आणखी एकाने लिहिलेय, “मस्तच गं” आणखी एकाने लिहिलेय, “खूप गर्ल.”
