Viral Video: खेडेगावातील मुलंही आता आपल्या अंगी असलेली कला सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर सादर करताना दिसतात. पूर्वी ग्रामीण भागातील अनेक मुलांना आपली कला दाखवण्यासाठी फारशा संधी उपलब्ध होत नव्हत्या; मात्र आता मोबाईल आणि इंटरनेटमुळे ही परिस्थिती बदलली आहे. गावातील मुलं डान्स, गायन, अभिनय अशा विविध कलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या अंगातील कलागुण, मेहनत आणि आत्मविश्वास पाहून नेटकरीही त्यांचं कौतुक करतात. अनेकदा ग्रामीण भागातील मुलांचे साध्या वातावरणात चित्रित केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. त्यामुळे सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, ग्रामीण भागातील मुलांना आपली कला सादर करण्यासाठी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.

डान्सची आवड हल्ली अनेकांमध्ये पाहायला मिळते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण आपल्या आवडीने डान्स करताना दिसतात. पूर्वी डान्स हा प्रामुख्याने मनोरंजनाचा एक प्रकार मानला जायचा; मात्र आता सोशल मीडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डान्सला एक वेगळी ओळख मिळाली आहे. इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जण आपल्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. काही जण लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरतात, तर काही जण पारंपरिक नृत्यशैलीतून आपली कला सादर करतात. विशेष म्हणजे, डान्स करण्यासाठी कोणत्याही वयाची किंवा विशेष प्रशिक्षणाची अट नसते. मनापासून डान्स करण्याची आवड असेल, तर कोणतीही व्यक्ती आपल्या आनंदासाठी नृत्य करू शकते. त्यामुळेच आज सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांच्या डान्सचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी नदीच्या किनारी सुंदर डान्स करताना दिसत आहे. ‘कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं’ या गाण्यावर ती अतिशय सुंदर हावभाव करत ठेका धरताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि डान्स करण्याची सहज शैली नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नदीच्या किनाऱ्यावरील निसर्गरम्य वातावरणात या चिमुकलीचा डान्स अधिकच खुलून दिसतो. तिच्या या सुंदर डान्सचा व्हिडीओ पाहून अनेकजण तिच्या कलेचे कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Jharna Roy (@_bristi__official_07)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_bristi__official_07या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज अन् लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्वा किती सुंदर” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुली काय सुंदर नाचलीस”