Viral Video: नृत्य (डान्स ) ही कला आहे. ही कला जोपासावी लागते. प्रत्येक व्यक्ती तिला जमेल तसे डान्स करू शकते पण ज्यांना उत्तम डान्सर व्हायचे आहे असे लोक सातत्याने प्रयत्न करत राहतात आणि आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात. सध्या अशाच एका गोड चिमुकली व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी तिचे चाहते झाले आहेत.
हल्ली सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. ज्यातील काही व्हिडीओ निरर्थक विषयांवर आधारित असतात, ज्याला व्ह्यूज लाखो असल्या तरीही त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल असे काहीच नसते. पण, अनेक युजर्स असेही असतात जे सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
अनेक लहान मुलांना त्यांच्या बालपणापासूनच आपली आवडती कला कोणती, छंद कोणते हे कळतं; त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा चिमुकल्यांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी सुंदर डान्स करताना दिसतं तर कधी कोणी सुमधूर आवाजात गाणं गाताना दिसतं. शिवाय अनेक जण अभिनयही करताना दिसतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली गाण्याला साजेसा पोशाख परिधान करून ‘रंगीलो मारो ढोलना’ या बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स लक्ष वेधून घेत आहे. ही चिमुकली करत असलेला सुंदर डान्स तुम्ही आजवर क्वचित कुठे पाहिला असेल. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
A post shared by Bharat Barkat Babita (3Bs) (@thehappylittleclinic)
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @thehappylittleclinic या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास चार मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “तुला खूप खूप आशीर्वाद मुली, खूपच सुंदर डान्स करतेस.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूपच कडक डान्स.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “एक्स्प्रेशन्स आणि डान्स कमाल.” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.
