Viral Video: हल्लीची लहान मुलंही आपल्या कलागुणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. पूर्वी एखाद्या मुलाला नृत्य, गायन, अभिनय किंवा चित्रकलेची आवड असेल तर त्याला आपली कला सादर करण्यासाठी मर्यादित संधी मिळायची; मात्र आता सोशल मीडियामुळे लहान कलाकारांना आपली कला मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य झाले आहे. अनेक चिमुकले अगदी कमी वयातच डान्स, गाणे, अभिनय, वादन अशा विविध कला आत्मसात करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या निरागसपणासोबतच आत्मविश्वास आणि कलाकौशल्य पाहून नेटकरीही कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. काही मुलांच्या डान्समधील अचूक स्टेप्स, अभिनयातील हावभाव किंवा गाण्यातील सुरेल आवाज पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते. पालकही मुलांच्या आवडीला प्रोत्साहन देत त्यांचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे अनेक चिमुकल्या कलाकारांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे. सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता या छोट्या कलाकारांसाठी आपली प्रतिभा दाखवण्याचे एक मोठे व्यासपीठ ठरत आहे.

डान्स ही अनेकांची आवडती कला आहे. संगीताची ताल-लय आणि शरीराच्या हालचालींच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याची संधी डान्समधून मिळते. काही जण छंद म्हणून डान्स करतात, तर काही जण यालाच आपलं करिअर बनवतात. सोशल मीडियामुळेही आपल्या डान्सची कला इतरांपर्यंत पोहोचवणं सहज शक्य झालं आहे. त्यामुळे विविध गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली आपल्या निरागस अंदाजात डान्स करताना दिसत आहे. तिच्या गोंडस हालचाली आणि आत्मविश्वासाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा हा भन्नाट डान्स पाहून अनेकजण तिचं कौतुक करत असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा सुंदर डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली ‘साजन तुमसे प्यार की लड़ाई’ या गाण्यावर अतिशय सुंदर आणि मनमोहक डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर ती उत्स्फूर्तपणे डान्सच्या स्टेप्स करत असून तिच्या निरागस हावभावांनी हा व्हिडीओ आणखीनच खास बनला आहे. तिचा आत्मविश्वास, डान्समधील सहजता आणि गोंडस अंदाज पाहून नेटकऱ्यांचेही लक्ष तिच्याकडे वेधले जात आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Tridha naskar (@naskarbiswasjit)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @naskarbiswasjit
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी डान्स केला हिने” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स बाळा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच गोड डान्स”