Viral Video: हल्लीची मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.
हल्ली सोशल मीडियावर अनेक महिला कलाकारांच्या लावणी नृत्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओंमध्ये काही महिला लावणीच्या नावाखाली त्यांच्या नृत्यातून केवळ अश्लील हावभावच दाखविताना दिसतात. फार कमी महिला त्यांच्या व्हिडीओतून साध्या व सुंदर पद्धतीने पारंपरिक लावणी सादर करतात; ज्यात कोणत्याही अश्लीलतेऐवजी सुंदर हावभाव आणि स्टेप्सचे दर्शन झाले. आता असाच एक भन्नाट व्हिडीओ समोर आलाय की, ज्यात एक चिमुकली लावणी करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमामध्ये एक चिमुकली संपूर्ण साजशृंगार करून, “तुझ्या उसाला लागल कोल्हा” गाण्यावर लावणीचा सादर करताना दिसतेय, यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gaurimore_28 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. युजर्सही या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. एकानं लिहिलंय, “आई गं, खूपच गोड”, तर दुसऱ्यानं लिहिलंय, “खूप सुंदर डान्स”, तर तिसऱ्यानं लिहिलंय, “काय नाचते राव ही एकच नंबर.”
