Viral Video: लावणी हा आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेचा प्रकार आहे. महाराष्ट्राची शान म्हणून लावणी नृत्य ओळखले जाते. त्यामध्ये संगीत, नृत्य व गीत यांचा मिलाफ साधलेला असतो. लावणी नृत्यामध्ये कलाकार पायांत घुंगरू बांधून, ढोलकीच्या तालावर ते सादर करतात. सोशल मीडियावर अनेक जण ही मराठी लोककला सादर करताना दिसतात. लावणीच्या विविध गाण्यांवर नृत्य करताना दिसतात. दरम्यान, आता एका चिमुकलीने सादर केलेल्या लावणीचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

हल्ली सोशल मीडियावर अनेक महिला कलाकारांच्या लावणी नृत्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओंमध्ये काही महिला लावणीच्या नावाखाली त्यांच्या नृत्यातून केवळ अश्लील हावभावच दाखविताना दिसतात. फार कमी महिला त्यांच्या व्हिडीओतून साध्या व सुंदर पद्धतीने पारंपरिक लावणी सादर करतात; ज्यात कोणत्याही अश्लीलतेऐवजी सुंदर हावभाव आणि स्टेप्सचे दर्शन झाले. आता असाच एक भन्नाट व्हिडीओ समोर आलाय की, जो तुम्ही आवडीने पाहाल.

हल्ली सतत अनेक नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका चिमुकलीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात ती लावणी करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान चिमुकली संपूर्ण साजशृंगार करून, लावणीचा तोडा सादर करीत आहे. लावणीचा तोडा सादर करताना त्या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून समोर उभे असलेले प्रेक्षकही तिला दाद देताना दिसत आहेत. त्याशिवाय तिच्या या व्हिडीओवरही नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by ?शिवाज्ञा स्नेहल विशाल मानकर……?? (@shivu._9780)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shivu._9780 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. युजर्सही या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. एकानं लिहिलंय, “लावणी ची क्वीन”, तर दुसऱ्यानं लिहिलंय, “त्या लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करणाऱ्या मुलींना दाखवा हा व्हिडीओ”, तर तिसऱ्यानं लिहिलंय, “गौतमीला पण असं जमत नाही.”