Viral Video: बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत, तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. असं म्हणतात, एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. शिवाय मुलीदेखील आपल्या वडिलांना खूप जीव लावतात. त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतात. वडील आपल्या मुलीला नेहमी सुखात ठेवण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी करतात. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही भारावून जाल.

सोशल मीडियावर नेहमीच विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओंमध्ये रील्स, गाणी, डान्स अशा प्रकारचे असंख्य विषय पाहायला मिळतात; आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Queen Nefertiti bust
Queen Nefertiti bust: ३,३७० वर्षे प्राचीन इजिप्तची राणी परंतु तिचा पुतळा जर्मनीत; नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तला परत मिळणार का?
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
Indian culture Cambodia: ९०० वर्षे जुनी द्वारपालांची शिल्पं सापडली; कंबोडियात उलगडला भारतीय शिल्पकलेचा वारसा!
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Viral video of hostel boys put firecrackers in the drum Diwali video went viral on social media
ड्रममध्ये फटाका लावल्यानंतर काय झालं पाहा! VIDEO पाहून बसेल धक्का

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या चिमुकलीला बाईकवरून फिरायला घेऊन गेलेले बाबा तिला त्यांच्या पुढ्यात बसवतात. पण, पुढे बसल्यावर तिला काही होऊ नये म्हणून आधीच त्यांनी स्वतःचा टी-शर्ट मध्यभागी फाडलेला असतो. या फाटलेल्या भागातून मुलीचं डोकं बाहेर काढून तिला टी-शर्टबरोबर पॅक करतात, यामुळे चिमुकली गाडीवर बसल्यावर सुखरूप राहू शकते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “आईशप्पथ, याला बोलतात डान्स…”, ‘मोरनी’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @siddhart.singh33 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत १६ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

एका युजरने लिहिलेय, “मस्त, खूप छान.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अरे व्वा, मी पण हीच आयडिया वापरेन.” आणखी एका युजरने लिहिलेय, “देसी जुगाड.”