Dance Video: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेक जण अगदी मनमोकळेपणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून बिनधास्त डान्स करताना दिसतात.
मराठी, हिंदी अशा अनेक भाषांमधील गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करत असतात. त्यात एखादा नवीन चित्रपट आला आणि त्यातलं गाणं प्रसिद्ध झालं की सोशल मीडियावर याचा ट्रेंडच सुरू होतो. अनेक सोशल मीडिया युजर्स, इन्फ्लूएन्सर्स एवढंच नाही तर अभिनेतेदेखील यावर डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोन तरुण पीलींग्स गाण्यावर डान्स करताना दिसतायत.
‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील ‘पीलिंग्ज’ (Peelings) हे एक अतिशय लोकप्रिय गाणं ठरलं, अनेकांनी यावर डान्स करून आपले व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर केले. सध्या असाच एक हटके डान्स परफॉरमन्स व्हायरल होतोय, ज्यात दोन तरुणांनी या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. चला तर मग जाणून घेऊया, सोशल मीडियावरील लोकांना या डान्सचं इतकं वेड का लागलं आहे.
व्हायरल व्हिडीओ (Dance Viral Video)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दोन तरुण स्टेजवर अगदी जोशात डान्स करताना दिसत आहेत. पुष्पा २ सिनेमातील पीलिंग्स या गाण्यावर दोघं थिरकताना दिसतायत. अगदी हुबेहूब डान्स करत त्यांनी सगळ्यांचं मन जिंकलं आहे. त्यांचा एनर्जेटिक परफॉरमन्स सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.
हा व्हिडीओ @varun_mehra21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल २.३ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “एनर्जेटिक परफॉरमन्स” तर दुसऱ्यानं, “बापरे, काय अप्रतिम डान्स केल आहे, अल्लू अर्जुनला मागेच टाकलं…” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “खूपच छान डान्स केला आहे, डान्स बघूनच खूप छान वाटत आहे.”
