Viral Video: मोठ्या जोशात स्टेजवर मुलीसोबत करत होता डान्स; मात्र झालं असं की तुम्हालाही हसू आवरणार नाही

स्टेजवर डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Dance_Viral_Video
Viral Video: मोठ्या जोशात स्टेजवर मुलीसोबत करत होता डान्स; मात्र झालं असं की तुम्हालाही हसू आवरणार नाही

करोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. जवळपास दोन वर्ष घरात काढल्याने सोहळ्यांना लोकांची उपस्थितीही दिसत आहे. लग्न म्हटलं की नाचणं आलंच. लग्नात काही बँडवर, काही डीजेवर, तर काही जण स्टेजवर डान्स करतात. असाच स्टेजवर डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. एक स्टेप करताना तर मुलगा मुलीला घेऊन खाली पडतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. २८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसत आहे. काही जोडपी डीजेवर नाचत आहेत. यादरम्यान एक मुलगा आपल्या जोडीदार मुलीला उचलून काही वेगळ्या डान्स स्टेप्स करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुलीला उचलत असताना त्याचा तोल बिघडतो आणि तो तिच्यासोबत खाली पडतो.

खाली पडल्यानंतर, मुलगी कशीतरी स्वतःला सांभाळते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून बसते. दोघं खाली पडल्यानंतर तिथे उभे असलेल्या लोकांना हसू आवरत नाही. व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video dancing on the stage boy falls down with the girl rmt

Next Story
VIRAL VIDEO: “तुम्ही दंड आकारू शकता…पण मारू शकत नाही!” ८ वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने त्याला कानशिलात लगावली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी