viral video three daughter dance for father : समाजाला, परिस्थितीला घाबरून जगणारा एकमेव माणूस कुटुंबात असतो, तो म्हणजे बाबा. मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून प्रत्येक गोष्टी मागे सोडतो. पण त्याचबरोबर कसे कपडे घालू, कसं राहू, स्वतःसाठी खर्च करू का असा सतत विचार करत असतो. त्यामुळे मुलांना मोठं करताना कुठेतरी त्यांचं मनापासून किंवा अगदी मनासारखं जगायचं राहूनचं जातं. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल आणि काही क्षणासाठी डोळ्यातून पाणी सुद्धा येईल.

आई-बाबांच्या लग्नाचा २५ व्या वाढदिवस खूप जल्लोषात साजरा होत असतो. पाहुणे मंडळी जमलेली असतात, सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येतो. पण, या सगळ्यात तीन मुलींनी मिळून बाबांसाठी केलेला सुंदर डान्स लक्ष वेधून घेतो. ट्यूबलाईट चित्रपटातील “नाच मेरी जान” या गाण्यावर तिन्ही मुली बाबांना स्टेजवर उभं करून त्यांच्या भोवती डान्स करायला लागतात. प्रत्येक मुलगी गाण्याचे खास कडवं बाबांना डेडिकेट करून गातात आणि त्यानुसार स्टेप्स सुद्धा करताना दिसतात.

“डान्स पाहून डोळ्यांत आनंदाश्रू आले” (Viral Video)

‘तू मेरा हुकुम का इक्का’ ओळ म्हणतं पहिली लेक, मग ‘तू मेरी बोली का सिक्का’ म्हणतं दुसरी लेक तर ‘मैं किसी से कम नहीं तूने सिखाया’ ही खास ओळ म्हणतं तिसरी लेक येते आणि बाबांचे मन भरून येते. लेकीचा उत्साह पाहून बाबा देखील कंबर हलवत डान्स करायला आणि पाहुणे मंडळी सुद्धा जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. जर तर, लोकांची चिंता सोडून मनासारखं जगा असं नकळत या गाण्याद्वारे लेकी बाबांना म्हणताना दिसत आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nitagupta609 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आजच्या दिवशी जर तर सोडा आणि पुरेपूर आयुष्य जगा’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “किती सुंदर डान्स केला आहे”, “डान्स पाहून डोळ्यांत आनंदाअश्रू आले”, “मुली चांगल्याच असतात”, “तू मला घाबरवू शकत नाहीस, माझ्या तीन मुली आहेत”, ‘मुलीचे खरे हिरो तिचे बाबाच असतात”, “म्हणूनच प्रत्येक बापाला एक तरी लेक हवीच” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.