Viral Video: समाजमाध्यमांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वापरामुळे लोकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होताना दिसत आहे. घरातील सदस्यांबरोबर, मित्रांबरोबर समोरासमोर गप्पा मारण्याची मजा हल्ली हरवली असून याची जागा आता मोबाइलवरील रील्सने घेतलेली आहे. सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे अचूक लक्ष असते. या ट्रेंडनुसार लोक गाणी, रील्स, व्हिडीओ बनवताना दिसतात. अनेकदा आपल्याला भरपूर प्रसिद्धी मिळावी यासाठी ते कोणत्याही थराला जातात. ज्यात कोणी स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो तर कोणी कसलीही पर्वा न करता अश्लील चाळे करताना दिसतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ आपण पाहिलेच असतील.
अनेकदा सोशल मीडियावर अपघाताचे किंवा भांडण, मारहाणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो; जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा या घटनांमागे केवळ सोशल मीडियासाठी स्टंट करणं हा उद्देश असतो, ज्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करताना दिसतात. अशा दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेला मुलगी झाली म्हणून सासू आणि नवऱ्याकडून मारहाण केली जात आहे. त्या तिघांच्या भांडणात लहान मुलीचे हाल केले जातात. सुरुवातीला हा व्हिडीओ खरा आहे असे वाटत होते, परंतु हा व्हिडीओ केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तयार केला असल्याचे म्हटले जात आहे. प्रसिद्धीसाठी लोक लहान मुलांच्या जीवाशी खेळ करतात हे पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रावरील @ajit.lavate97 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लाखो व्ह्युज मिळाल्या असून हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
एकाने लिहिलंय की, “ढोंगी लोक”, तर दुसऱ्याने लिहिलंय, “मूर्खांचा बाजार”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “प्रसिद्धीसाठी मूर्खपणा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “जग बिघडतंय.”