Viral Video Daughter Surprise Father With Ring : वडील आणि मुलगी यांचं नातं हे फक्त रक्ताचं नसून प्रेम, काळजीचं असतं. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी वडील नेहमी आपल्या मुलीसाठी ठामपणे उभे राहतात. मुलगी आनंदी असेल तर वडीलही आपोआप आनंदी होतात. मुलीच्या मनातही वडिलांसाठी खूप खास जागा असते. त्यांच्या कष्टांची आणि प्रेमाची जाणीव ठेवून त्यांना आनंदी ठेवण्यासाठी ती नेहमी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. सध्या सोशल मीडियावर असा एक भावूक क्षण व्हायरल होत आहे, ज्याने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ पाहताना अनेकांना नकळत डोळ्यांत पाणी येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना एक खास सरप्राइज देताना दिसते. ती आधी त्यांना डोळे बंद करायला सांगते आणि त्यांच्या हातात एक छोटासा डब्बा ठेवते. वडील तो डब्बा उघडतात, मात्र आत काय आहे हे पाहताच ते क्षणभर थांबतात आणि लगेचच डब्बा बंद करतात. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळू लागतं. डब्ब्यात सोन्याची अंगठी असते, जी त्यांच्या मुलीने स्वतःच्या कमाईतून प्रेमाने त्यांच्यासाठी आणलेली असते.
वडील वारंवार ते गिफ्ट नाकारत असतात. “हा कशाला खर्च केलास?” असं सांगत ते अंगठी घ्यायला तयार नसतात, पण मुलगी प्रेमाने आणि हट्टाने त्यांच्या बोटात अंगठी घालते, त्यांना हसण्यास सांगते. शेवटी वडीलही आपल्या भावना लपवू शकत नाहीत. अभिमान, आनंद आणि प्रेम या सगळ्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात आणि ते ती अंगठी अभिमानाने दाखवतात.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यानंतर लगेच तुफान व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला असून हजारो युजर्सनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आपापल्या वडिलांच्या आठवणी शेअर केल्या. एका युजरने लिहिलं, “काका एकाच वेळी भावूक आणि गर्वाने भरून गेले.” तर दुसऱ्याने म्हटलं, “असे वडील खरंच हे गिफ्ट डिझर्व्ह करतात.”
काहींनी स्वतःच्या अनुभवांबद्दल लिहिताना सांगितलं की, त्यांनीही आपल्या वडिलांना अशाच प्रकारे काहीतरी भेट दिली होती आणि तो क्षण त्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता; तर काहींनी भावूक होत लिहिलं, “, माझे वडील आज असते तर मीही त्यांना असंच काहीतरी देऊ शकलो असतो.” वडील–मुलीच्या या नात्याची सुंदर झलक पाहून सोशल मीडिया भावनांनी भरून गेला आहे.

