CCTV : साखळीचोराला पकडण्यासाठी पोलिसाने रचला सापळा; थरार सीसीटीव्हीत कैद | Viral video Delhi cop risks his life to arrest snatcher cctv footage | Loksatta

CCTV : साखळीचोराला पकडण्यासाठी पोलिसाने रचला सापळा; थरार सीसीटीव्हीत कैद

हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे

CCTV : साखळीचोराला पकडण्यासाठी पोलिसाने रचला सापळा; थरार सीसीटीव्हीत कैद
दिल्ली पोलिसांच्या शौर्याचे नेटकरी कौतुक करत आहेत (फोटो : सोशल मीडिया)

कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन केले जावे याची जबाबदारी पोलिसांवर असते. त्यासाठी त्यांना सदैव जागृक राहावे लागते, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलिसांना तुम्ही पहिले असेल. अशाच एका पोलिसाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस एका साखळीचोराला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. ‘स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शहााबाद डेअरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सतेंद्र यांनी एका साखळीचोराला अटक केली. या अटकेमुळे ११ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला’, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. सतेंद्र यांनी या साखळीचोराला बाइकवरून खेचत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ढकलत बाइकवरून उतरत चोराने तिथून पळ काढला. मात्र शेवटी या चोराला पकडण्यात यश आले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : छताला चिकटलेला फुगा काढण्यासाठी त्याने मुलालाच वर फेकले अन्…; Viral Video पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल

व्हायरल व्हिडीओ :

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीस नेहमी कर्तव्य पूर्तीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काहीही करू शकतात हे या व्हिडीओतून स्पष्ट होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 10:35 IST
Next Story
Viral: भररस्त्यात गेंडा भ्रमंती…; रोहित शर्माची बायको Video शेअर करत म्हणते, ‘हा’ Special..