scorecardresearch

Premium

Video! ‘या’ जोडप्याने चक्क रुग्णालयात केलं लग्न; कारण ऐकून व्हाल थक्क…

एका जोडप्याने चक्क रुग्णालयामध्ये लग्न केलं आहे…

Viral Video delhi groom down with dengue before wedding couple got married in a hospital
(सौजन्य:ट्विटर/@Benarasiyaa) Video! 'या' जोडप्याने चक्क रुग्णालयात केलं लग्न; कारण ऐकून व्हाल थक्क…

लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट असते. यादरम्यान साखरपुडा, हळद, लग्न आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच या कार्यक्रमांना आणखीन कसे खास करता येईल, याकडे प्रत्येकाचे लक्ष असते. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका जोडप्याने चक्क हॉस्पिटलमध्ये लग्न केलं आहे.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील आहे. २७ वर्षीय अविनाश कुमार हा पूर्व दिल्लीचा रहिवासी आहे. लग्नापूर्वी त्याला डेंग्यू हा आजार झाला. यानंतर त्याला वैशाली येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच लग्नाच्या तारखेपर्यंत अविनाश याची तब्येत सुधारली नव्हती. पण, लग्नाची तारीख आधीच ठरली असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाशी बोलून रुग्णालयातच त्याचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर रुग्णालय तुम्हाला एका लग्न मंडपासारखे सजवण्यात आलेले सुद्धा दिसेल. तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ…

palghar marathi news, dahanu sub district hospital marathi news,
डहाणू उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती वॉर्डातील खाटेवर कोसळले प्लास्टर; रुग्णांच्या जीवाला धोका
mumbai, sion hospital, seventy year old grandmother, rare surgery
मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयात सत्तरीच्या आजीवर दुर्धर शस्त्रक्रिया!
Theft of doctors vehicles in Government Medical College and Hospital in Nagpur
नागपुरातील मेडिकलमध्ये डॉक्टरांच्याच वाहनांची चोरी…
student and his father brutally beaten up by two men in kalyan
Kalyan Crime: कल्याणमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण

हेही वाचा…बहिणीच्या लग्नात मेहुणीनं साधला डाव! नवरदेवाच्या गळ्यात हार घालायचा प्रयत्न अन्….VIDEO पाहून बसेल धक्का

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरा आणि नवरी लग्नासाठी खास तयार झाले आहेत. तसेच हॉस्पिटलसुद्धा लग्न मंडपासारखे सजवण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये जोडीदार एकमेकांना हार घालताना दिसत आहेत आणि दोघांच्या कुटुंबातील सदस्य गुलाबाच्या पाकळ्यांचा त्यांच्यावर वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच यादरम्यान एक फोटोग्राफरदेखील बोलावण्यात आला आहे आणि हॉस्पिटलमध्ये हे अनोखं लग्न करण्यात आले आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणाच्या हातावर काही पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Benarasiyaa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या अनोख्या लग्नाची खास माहिती लिहिण्यात आली आहे आणि सोशल मीडियावर या व्हिडीओने आणि या अनोख्या लग्नाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video delhi groom down with dengue before wedding couple got married in a hospital asp

First published on: 01-12-2023 at 18:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×