Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे दिल्लीची मेट्रोदेखील अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडिया युजर्ससाठी दिल्ली मेट्रोतील व्हायरल झालेले व्हिडीओ पाहणं ही गोष्ट आता काय नवीन राहिलेली नाही. प्रवाशांच्या सुखसोईंसाठी असणारी ही मेट्रो आता काही जणांसाठी मनोरंजनाचा भाग झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांच्या सोईसाठी असलेली ही दिल्ली मेट्रो आता सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सरच्या नावाखाली अश्लीलपणा करणाऱ्या तरुणांचा जणू अड्डाच झाली आहे. मेट्रोमध्ये सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर थिल्लर डान्स करून प्रसिद्धी मिळवतात. तसेच या मेट्रोत अनेकदा भांडणं होतात आणि ते वाद हाणामारीपर्यंतही जाऊन पोहोचतात. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन माणसं अगदी चपलेनं एकमेकांना मारताना दिसतायत. नक्की काय घडलं ते पाहूया.

हेही वाचा… Viral Post: “असा कोणाचा फोन बघायचा नसतो”, चिमुकल्याने केला अनोळखी तरुणीला फोटो दाखवण्याचा हट्ट; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल थक्क

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) तो माणूस चप्पल काढून दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मारताना दिसतोय. त्यानंतर तो माणूस चिडतो आणि हल्लेखोराला मारतो. नंतर हल्लेखोराच्या कानशिलात लगावतो आणि त्याची मान धरून त्याला खाली ढकलतो.

या दोघांच्या हाणामारीत एक तिसरा माणूस हस्तक्षेप करतो आणि त्यांना अडवतो. तसंच चप्पलनं हल्ला करणारा माणूस दारूच्या नशेत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ ‘हकीकत आप तक Social Media News Channel’ या एक्स अकाउंटवरून व्हायरल होत आहे. ‘कुछ इस तरह से दिल्ली मेट्रो में आपका स्वागत है’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हेही वाचा… अजबच! मुंबई लोकलच्या दरवाजावर पठ्ठ्याने चिकटवला फोन अन् गाणी ऐकण्यासाठी केला ‘असा’ जुगाड, VIDEO पाहून नेटकरी म्हणाला, “डब्बा लगेज, अंकल सेवेज”

दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा… रीलसाठी केली हद्द पार! भररस्त्यात झिंज्या उपटणारं भांडण पाहून तरुणीने शूट केला VIDEO; संतप्त नेटकरी म्हणाले,“दररोज असे फालतू…”

दरम्यान, सोशल मीडियावर हल्ली काही ना काही व्हायरल होत असतंच. दिल्ली मेट्रोत असे प्रकार रोज घडत असून, अनेक प्रवाशांवर याबद्दल कारवाईदेखील करण्यात आली आहे. तरीही अशी प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video delhi metro ugly fight with slipper on face on social media dvr
Show comments