Delivery Boy Gets Unique Payment with Note Garland viral video : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. यादरम्यान लग्नाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई आणि विविध गोष्टींनी घर सजवलं जाते. कोणीही घरात आलं की, त्यांचे तोंड गोड केल्याशिवाय त्याला पाठवले जात नाही, कोणी काम करायला आलं तरीही त्याच्या हातावर जास्तीचे पैसे टेकवले जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये लग्न घरात पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयला अनोख्या पद्धतीने पैसे देण्यात आले आहेत.
भव्य श्रीधरने याने इन्स्टाग्राम शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाच्या तयारीने गजबजलेल्या घरातील एक क्षण दाखवला आहे. कुटुंबातील एका सदस्याने ब्लिंकइटवरून काहीतरी ऑर्डर केले त्याचे बील म्हणून २००० रुपये द्यायचे होते. पण, जेव्हा डिलिव्हरी एजंटने सुट्टे पैसे आहेत का असे विचारले, तेव्हा त्या कुटुंबाने अनोखा जुगाड शोधून काढला. एका कुटुंबाने सुट्टे पैसे तर दिलेच. पण, या सुट्ट्या पैशांची एक नोटांची माळ बनवून दिली आहे आणि नवरदेवाप्रमाणे त्याच्या हातात दिली.
कुटुंबाने थेट पैसे हातात देण्याऐवजी, २००० ची “नोटांची माळ” (नोटांनी बनवलेला हार) दिली. अशी माळ देण्याची पद्धत भारतात लग्नात किंवा खास प्रसंगी भेट म्हणून दिली जाते. त्यामुळे डिलिव्हरी करणाऱ्या माणसाला हे पाहून खूप आश्चर्य वाटलं, पण त्यानेही आनंदाने ती माळ गळ्यात घातली. आजूबाजूचे लोक हे पाहून हसायला लागले आणि तो क्षण मजेशीर झाला. लग्न घरात कुटुंबाने कशाप्रकारे डिलिव्हरी बॉयला बिलचे पैसे दिले एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shridhar_bhavya7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “सर्वात राजेशाही पद्धतीने पैसे मिळाले आहेत”, “लग्नाच्या विधीसारखं पेमेंट करणं फक्त भारतीयांना जमू शकतं”, ‘डिलिव्हरी बॉय सुद्धा आनंद लुटताना दिसला”, “असं फक्त भारतात होऊ शकतं”, डिलिव्हरी बॉय सुद्धा जबरदस्त आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…
