delivery boy guard women home viral video : आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके व्यस्त झालो आहोत की, छोट्या-छोट्या गोष्टीतही माणुसकी दाखवायला विसरतो. हातगाडीवरून एखादं फळ पडलं तरी ते उचलून देण्याइतकाही आपल्याकडे वेळ किंवा इच्छा उरत नाही. सतत कोणाला तरी हरवायचं, कोणाच्या तरी पुढे जायचं या स्पर्धेत आपण स्वतःला इतकं गुंतवून ठेवलं आहे की, हळूहळू माणुसकीच मागे पडत चालली आहे. पण, सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये एका डिलिव्हरी बॉयने दाखवलेली माणुसकी लक्ष वेधून घेत आहे.
महिलेने अमजद अन्सारी या डिलिव्हरी बॉयला टॅग करून त्याचे कौतुक केलं आहे. महिलेकडून चुकून घराचं दार उघडं राहिलं होतं आणि घरात एक मांजर सुद्धा होती. डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला तेव्हा त्याने पाहिलं आणि महिलेला कॉल करून तिच्या लक्षात आणून दिले. पण, महिला पुन्हा घरी येईपर्यंत डिलिव्हरी बॉयने तिकडून पळ न काढता घराची देखरेख करण्याचे ठरवले. जेणेकरून मांजर बाहेर पळून जाऊ नये. डिलिव्हरी बॉयची ही माणुसकी पाहून महिलेला खूप आनंद झाला.
डिलिव्हरी बॉयचा कॉल येताच तिने चालत घराकडे येताना व्हिडीओ शूट केला आणि घडलेला प्रसंग सांगत व्हिडीओत त्याचे कौतुक करताना दिसली. एवढंच नाही तर तिने दरवाजा उघडा राहिल्याचे आणि डिलिव्हरी बॉय दरवाजा बाहेर उभा राहिल्याचे व्हिडीओत सुद्धा दाखवले आहे. ती घराजवळ पोहचताच तिने सगळ्यात आधी डिलिव्हरी बॉयचे आभार मानले आणि मांजर आणि पार्सलची झलक व्हिडीओत सुद्धा दाखवली. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @divyaunnyfilms या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “डिलिव्हरी बॉयच्या प्रामाणिकपणाचं आणि जबाबदारीचं खूप कौतुक. कंपनीला टॅग करत तिने लिहिले की, अशा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ व्हायला हवी आणि त्यांना ओळख मिळायला हवी. जगात असे प्रामाणिक आणि चांगले लोक जास्त असतील तर जग अजून चांगलं बनेल आणि असा डिलिव्हरी बॉय मिळणे खरोखरचं नशीब आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
