आजचे युग हे सोशल मीडियाचे असून, संपूर्ण जग मोबाईलच्या स्क्रीनमध्ये विलीन झाले आहे. तुम्हाला हसायचं असेल, अभ्यास करायचा असेल किंवा आयुष्याचा जोडीदार शोधायचा असेल, मोबाईलच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी मिळू शकतात, पण तंत्रज्ञान लोकांच्या हातात आल्याने आजच्या तरुणाईचा उत्साह कमी होत चालला आहे. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडीओ दाखवणार आहोत ज्याला पाहून तुम्हाला चिकाटीची नवी व्याख्या समजेल. कारण या व्हिडीओमध्ये एक अपंग व्यक्ती रस्त्याच्या कोपऱ्यावर स्ट्रीट फूड बनवताना दिसत आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक अपंग व्यक्ती रस्त्याच्या कोपऱ्यावर चाउमीन बनवताना दिसत आहे. तो आपले काम खूप प्रेमाने आणि प्रामाणिकपणे करत आहे. ज्याला पाहून लोकही त्याचे कौतुक करत आहेत. अवघ्या ३५ सेकंदांच्या या व्हिडीओला लाखो लोकांनी लाईक केले आहे. सध्या हा व्हिडीओ कुठला आहे आणि या व्यक्तीची ओळख काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या अपंग व्यक्तीची मेहनत पाहून लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आहे. काही लोक त्याला मदत करण्याबाबत बोलत आहेत, तर काहींनी जिद्द असेल तर जगात सर्व काही शक्य आहे, असे सांगितले.

आणखी वाचा : अरे बापरे! पर्यटकांसह उंचावरून जमिनीवर धाडकन कोसळलं हॉट एअर बलून, VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

सध्या हा व्हिडीओ कुठला आहे आणि या व्यक्तीची ओळख काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या दिव्यांगाची मेहनत पाहून लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आहे. काही लोक त्याला मदत करण्याबाबत बोलत आहेत, तर काहींनी जिद्द असेल तर जगात सर्व काही शक्य आहे, असे सांगितले.