सोन पापडी ही एक देसी मिठाई आहे, जी अगदी सगळ्याचं आवडे. तुम्ही कोणत्याही मिठाईच्या दुकानात गेलात की छान बॉक्समध्ये पॅक केलेली सोन पापडी मिळते. खरं तर, सोन पापडीचे बॉक्स ही गिफ्ट म्हणून देण्यासाठी तर प्रसिद्ध मिठाई आहे. ही प्रसिद्ध मिठाई सोन पापडी बनवण्याची प्रक्रिया एक लांब आणि अवघड प्रक्रिया आहे. लगेच जिभेवर विरघळणारी ही मिठाई कशी बनते या संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

इंडिया इट मेनिया (indiaeatmania) द्वारे अलीकडेच समोर आलेल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये, ब्लॉगर सोन पापडी कशी बनवली जाते याची एक झलक दाखवतो. व्हिडीओचे लोकेशन गुजरातमधील मेगा किचन फॅक्टरीमधील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ सध्या यूट्यूबवरील टॉप ट्रेंडिंग व्हिडीओंमध्ये आहे आणि आजपर्यंत ६२ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अशी तयार होते सोन पापडी

व्हिडीओमध्ये एकाच वेळी ४ किलो सोन पापडीची तयारी दाखवण्यात आली आहे. प्रथम, साखरेचा पाक मशीनमध्ये तयार केला जातो आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवला जातो. मग एक कडक साखर एका विशाल रबर बँडसारखी रचना देण्यासाठी चार कामगार त्याची मालीश करतात. सुका मेवा, तूप आणि बेसनचे पीठ नंतर लूपच्या मध्यभागी टाकले जाते आणि पुन्हा चांगल्यापद्धतीने मिक्स केले जाते. सोन पापडी धाग्यासारखी आणि मऊ होईपर्यंत ही प्रक्रिया बर्‍याच काळासाठी पुनरावृत्ती केली जाते. मग, हे पट्ट्या एका साच्यात ठेवल्या जातात आणि सुका मेवा वरून टाकला जातो. नंतर त्याचे चौकोनी तुकडे केले जातात. सोन पापडीचे बॉक्स नंतर पॅक केले जातात आणि आपल्याला माहित असलेल्या स्वरूपात विकले जातात.

सोन पापडी बनवण्याच्या पडद्यामागील या व्हिडीओने नेटीझन्सची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. अलीकडेच, आणखी एक व्हायरल झालेल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये लोकप्रिय राजस्थानी गोड घेवर बनवण्याची पद्धत दाखवण्यात आली होती. सोन पापडीच्या विपरीत, मैदा वापरून आणि एका अनोख्या तंत्राने गरम तेलात तळत घेवर तयार केले जातात.

व्हिडीओ येथे पहा:

तुम्हाला ही प्रक्रिया माहित होती का?