Viral Video Woman Mocking Daughter In Law : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम लावता येत नाही. कोणी उंचावरून उडी मारतं, तर कोणी स्त्रियांची हुबेहूब नक्कल करतो, तर कोणी फूड ब्लॉगिंग करून इतरांपर्यंत चटपटीत खाद्यपदार्थ मिळणाऱ्या हॉटेलची नावे पोहचवतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जे पाहून तुमचाही नक्कीच संताप होईल. नॉर्मल असो किंवा सिझेरियन डिलिव्हरी त्यावेळी प्रत्येक महिलेला शारीरिक,भावनिक आणि मानसिक आधाराची गरज असते. पण, आज या कुटुंबाने काय केलं तुम्ही बघाच…

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील नाझ रुग्णालयात एका कुटुंबाने सुनेबरोबर प्रँक करण्याचे ठरवले. हा प्रँक व्हिडीओ रुग्णालयातील डॉक्टर नाझ फातिमा यांनी शूट केला. ज्या महिलेची डिलिव्हरी होणार असते तिच्या कुटुंबातील सदस्य तिच्या अवतीभवोवती उभे असतात. तर नवरा तिचा हात धरून उभा असतो; हे पाहून सासू नवऱ्याचा हात सोडण्यास सांगते. यादरम्यान तिथे उपस्थित एक महिला या कृतीचा विरोध करते. पण, प्रँक व्हिडीओ असल्यामुळे ती नाटक सुरूच ठेवते.

गर्भवती महिलेचा अपमान (Viral Video)

“तोंड बंद करू का तुझं, तुला कानाखाली मारू का, गळा दाबू का,” ; असं सासू म्हणायला सुरुवात करते. हे सगळं ऐकल्यावर नातेवाईक घाबरून वृद्ध महिलेला इशारा देत “अम्मा पोलिस केस होऊ शकते असं नका बोलू”. पण, वृद्ध महिला कोणाचेही न ऐकता आई होणाऱ्या महिलेला सामान्य प्रसूती करण्याचा सल्ला देत असते. नर्स नवजात बाळाला घेऊन आली तरीही वृद्ध महिलेचे गैरवर्तन सुरूच असते आणि सगळ्यात शेवटी ती आपल्या सुनेबरोबर अगदी प्रेमाने वागते; जे पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @drnaazfatima या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओवरील मजकुरात असेही म्हंटले आहे की, मस्करी करणे महागात पडले आहे (प्रँक किया था उल्टा पड गया) ‘ त्यामुळे वृद्ध महिलेच्या टिप्पण्या कदाचित मस्करीसाठी होत्या. त्याचप्रमाणे “अशा वेळी, एखाद्याने सौम्यपणे बोलावे” ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओवर लिहिल्याप्रमाणे हा प्रँक असला तरीही अनेकांनी सासूच्या वागण्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. तसेच काही जण “गर्भवती महिलेचा अपमान होत आहे आणि कोणीही एक शब्दही बोलत नाही हे”, “तुम्हाला सर्वांना सासू दिसतेय. पण, मला एक पती दिसतो जो आपल्या पत्नीची बाजू घेण्यात अयशस्वी ठरला आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसून आले आहेत.