Viral Video: श्वान हा खूप प्रामाणिक प्राणी आहे, त्याला जीव लावणाऱ्या व्यक्तींवर तोदेखील तितकाच जीव लावतो. आपल्या मालकाला त्याच्या संकटात मदत करतो. या लाडक्या प्राण्याला घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम, माया दिली जाते, त्यामुळे तो देखील घरातील व्यक्तींबद्दल प्रामाणिक असतो. घरातील सदस्यांवर इतरांप्रमाणेच हक्क दाखवतो; अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ आजपर्यंत आपण पाहिले आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात तो त्याच्या पाण्यात पडलेल्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.
संकटात सापडलेल्या व्यक्तीसाठी कधी, कोण, कोणत्या क्षणी देवदूत बनेल हे सांगता येत नाही. आजपर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात संकटात सापडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी काही लोक मदत करताना दिसले असतील. पण, नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका पाण्यात पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी श्वान कासावीस झालेला दिसत आहे.
काय घडलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तळ्याकाठी बांधलेल्या दोरीच्या मदतीने एक व्यक्ती तळ्यावरून झोका घेताना दिसते. पण, यावेळी अचानक त्याचा हात सटकून तो पाण्यात पडतो. ती व्यक्ती पाण्यात पडलेली पाहून तळ्याच्या काठावर उभा असलेला एक श्वान त्याच्या मालकाला वाचवण्यासाठी चक्क पाण्यात उडी मारतो, त्यानंतर दुसरा श्वानही पाण्यात उतरतो आणि मालकापर्यंत पोहोचतो. आपल्या मालकासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या या श्वानांचे हे प्रेम पाहून अनेक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: ‘दादा तू परत ये ना..’ पाण्यात उडी मारणाऱ्या भावासाठी बहिणीने केला आक्रोश; हृदयस्पर्शी Video Viral
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ ट्विटरवरील @Viral Content या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत हजारो व्ह्यूज अन् अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात एका मांजरीने जिन्यावरून पडणाऱ्या बाळाला वाचवले होते.