हुशार कुत्रा! जेवण मिळवण्यासाठी मित्राला कसा चकमा दिला एकदा पाहाच | Viral Video Dog makes a fool of his friend to have food given to him internet is impressed by the idea | Loksatta

हुशार कुत्रा! जेवण मिळवण्यासाठी मित्राला कसा चकमा दिला एकदा पाहाच

Viral Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

हुशार कुत्रा! जेवण मिळवण्यासाठी मित्राला कसा चकमा दिला एकदा पाहाच
जेवण मिळवण्यासाठी कुत्र्याने काय शक्कल लढवली पाहा (फोटो : सोशल मीडिया)

माणसांप्रमाणे प्राणीदेखील हुशार असतात, आपल्या फायद्याची गोष्ट त्यांना पटकन समजते. एखादी गोष्ट हवी असल्यास मालकाकडे हट्ट करणाऱ्या किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवणाऱ्या प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ हे आपल्याला अचंबित करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा जेवण मिळवण्यासाठी त्याच्या मित्राला चकमा देत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा जेवत असल्याचे, तर दुसरा कुत्रा बेडवर उभा राहून बाहेर बघत असल्याचे दिसत आहे. बेडवर असणाऱ्या कुत्र्यालाही जेवण हवे असल्याने तो एक शक्कल लढवतो. तो बाहेर बघत भुंकू लागतो, जेणेकरून दुसऱ्या कुत्र्याला असे वाटेल की बाहेर कोणीतरी आहे आणि तसेच होते तो बाहेरच्या दिशेला बघत भुंकू लागल्यावर जेवणारा कुत्रा तिथे येउन बाहेर बघू लागतो. पण तेवढ्यात हा हुशार कुत्रा जेवणावर ताव मारतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले असून, अनेकांनी कमेंट्समध्ये या कुत्र्याच्या युक्तीचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 16:58 IST
Next Story
भरधाव वेगानं जाणाऱ्या एक्स्प्रेससमोर आला हत्तींचा कळप, रात्रीच्या वेळी लोको पायलटने कमालच केली, पाहा Viral Video