Viral Video: कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा आणि प्रामाणिक मित्र म्हणून ओळखला जातो. माणूस जितका कुत्र्यावर प्रेम करतो तितकाच कुत्रा सुद्धा माणसांवर प्रेम करताना दिसतो. असाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने एका चिमुकलीला वाचवताना दिसत आहे.
सोशल मीडियावर कुत्र्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मालकाबरोबर खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ चर्चेत येतात. अनेकदा मालक सुद्धा आवडीने कुत्र्याचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. तुम्ही अनेक व्हिडीओमध्ये कुत्र्याचा प्रामाणिकपणा पाहिला असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल ती कुत्र्याला माणसाचा चांगला मित्र का मानतात.
मानवाला धोके कळण्यापूर्वीच प्राण्यांना ते कळतात असं म्हणतात. अशा परिस्थितीत, ते त्यांच्या मालकाला कोणत्यातरी कृतीतून आधीच इशारा देण्याचा प्रयत्न करतात नाहीतर ते स्वतःच धोक्याचा सामना करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
हा व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरासमोर एक श्वान निवांत बसला असून त्याच घरातील लहान चिमुकला बॉलने खेळताना दिसतोय. यावेळी अचानक चिमुकला त्याच्या हातातला बॉल रस्त्यावर फेकतो आणि तो बॉल पकडण्यासाठी धावतो. परंतु रस्त्यावरून गाड्या जात असल्याने कुत्रा त्या चिमुकल्याला पुढे जाऊन अडवतो व होणारा मोठा अपघात टळतो. कुत्र्याने चिमुकल्याप्रती दाखवलेले हे प्रेम पाहून तुम्हीही भावूक व्हाल. दरम्यान, हा व्हिडीओ खरा नसून AI आधारित असल्याचे म्हटले जात आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @parivartan_news वर पोस्ट करण्यात आला असून हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचंही म्हटलं; पण बहुतेकांनी कुत्र्याच्या समजुतीचं कौतुक केले. सत्य काहीही असो, या क्लिपनं पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित केली आहे की, पाळीव प्राणी फक्त सोबती नाहीत, तर ते कुटुंबाचा भाग आहेत आणि आपल्या मालकांसाठी त्यांचं जीवन धोक्यात घालण्यास ते नेहमीच तयार असतात.
