Dog Trapped In Railway Track Viral Video : प्राण्यांना माणसांसारखी समज नसते. जिथे रस्ता दिसेल तिथे ते फक्त रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे माणसांना प्राण्यांपासून वेगळं बनवणारी एकच गोष्ट असते ती म्हणजे माणुसकी. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लोकांनी हाच गुण दाखवून दिला आहे. एका श्वानाचा पाय रेल्वे ट्रॅकच्या इंटरलॉकिंगजवळ अडकला आहे आणि तो स्वतःला सोडवण्यासाठी ओरडत धडपडत आहे. पण, तेवढ्यात तिथे काही कर्मचारी आपली माणुसकीची जबाबदारी पार पाडत श्वानाच्या मदतीसाठी धावून जातात.
रुळावरून ट्रेन येत असते तितक्यात श्वानाचा पाय रेल्वे ट्रॅकच्या इंटरलॉकिंगजवळ अडकतो. श्वान स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असतो. पण, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो. ज्या क्षणी हा प्रसंग ट्रॅकवर काम करणारे कर्मचारी पाहतात. तेव्हा किमान चार ते सहा रेल्वे कर्मचारी श्वानाच्या मदतीसाठी धावून जातात. त्यांच्यापैकी एक जण ट्रॅक थोडा सैल करतो आणि मग दुसरा श्वानाचा पाय ट्रॅकमधून बाहेर काढतो. त्यानंतर, श्वानाची सुटका होते आणि तो रेल्वे ट्रॅकपासून दूर पळून जातो.
अशा प्रकारे, काही माणसे स्वतःचा जीव धोक्यात घालून, माणुसकी दाखवून एका प्राण्याचा जीव वाचवतात. रेल्वे रुळांवरून ट्रेन येत असताना ही संपूर्ण घटना घडली. पण, या बचाव मोहिमेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. एका युजरने कमेंट पाहून “कधीकधी सुदैवाने आपल्याला दयाळू मनाची व्यक्ती भेटते”, “श्वान ही मदत लक्षात ठेवेल याची खात्री आहे. श्वानांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. जेव्हा ते आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तीला भेटतात, तेव्हा ते आपली शेपटी हलवतात. त्यांचे हे वर्तनच खूप काही सांगून जाते” ; अशी कमेंट सुद्धा केली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @afeeadoh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “एक श्वान रुळांवर अडकला आहे. कामगार साहाय्याने त्याची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी रेल्वे कर्मचाऱ्यांना “देव त्यांना आशीर्वाद देवो. असे हिरो ज्यांच्याकडे सुपरहिरोची कॅप नसते. पण, तरीही ते खऱ्या आयुष्यात लोकांना मदत करून हिरोसारखे काम करतात” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत…
