Viral Video: अलीकडे दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडीओ व्हायरल होतील हे सांगता येत नाही. त्यावर अनेक प्राण्यांचे गमतीशीर व्हिडीओदेखील खूप चर्चेत असतात; ज्यात कधी मांजर, कुत्रा, माकड अशा विविध प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. नुकताच असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये तीन माकडांची टोळी एका कुत्र्याबरोबर असं काहीतरी करतेय, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर अनेकदा माकड आणि कुत्र्यांचे गमतीशीर व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यामध्ये कधी माकड आणि कुत्रा एकमेकांशी खेळताना दिसतात; तर कधी एकमेकांशी भांडताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तीन माकडांची टोळी माकड एका कुत्र्याजवळ येते आणि तिथे येऊन कुत्र्याला त्रास द्यायला सुरूवात करते. यावेळी माकडांना पाहून कुत्रा देखील मोठमोठ्याने भुंकतो. कुत्रा आपल्यावर भुंकतोय हे पाहून माकड अजून चवताळतात आणि कुत्र्याला आणखी त्रास देऊ लागतात. यावेळी त्यातील एक माकड चक्क कुत्र्याची शेपूट ओढते, ज्यामुळे कुत्र्याचा राग आणखी वाढतो. कुत्रा माकडाकडे पाहून मोठमोठ्या भुंकतो. पण तरी देखील माकडाच्या अंगातील मस्ती कमी होत नाही. माकड कट्ट्यावरून खाली उतरून कुत्र्याला पुन्हा त्रास देण्यास सुरूवात करते. माकड आणि कुत्र्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

हा व्हिडीओ युट्यूबवरील @rajendrasinghthakur3981 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून, त्यावर युजर्स अनेक कमेंट्स करीत आहेत. याबाबत एका युजरनं लिहिलंय, “खूपच मजेशीर आहे” तर, आणखी एकानं लिहिलंय, “बहुतेक त्यांचं काहीतरी जुनं भांडण असेल.” तर, आणखी एकानं लिहिलंय, “त्या निरागस कुत्र्यासोबत खूप वाईट झालं.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “माकड खूप खोडकर आहे, बिचाऱ्या कुत्र्याला विणाकारण त्रास देत आहेत.”