Viral Video: ‘डॉली की टपरी’ या नावाने चहाचा स्टॉल असणाऱ्या नागपूरचा सुनील पाटील अनोख्या स्टाईलमध्ये चहा बनविण्यासाठी बराच प्रसिद्ध आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक व प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी या प्रसिद्ध चहाविक्रेत्याची भेट घेतली आणि व्हिडीओ शेअर केला. त्याच व्हिडीओमुळे डॉली चहाविक्रेता भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आज या डॉली चहाविक्रेत्याने दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफाला भेट दिली आणि तेथील अनुभव शेअर केला.

नागपूरचा डॉली चहाविक्रेता सुनील पाटील याची मर्सिडीज G वॅगनमधून एंट्री होते. त्यानंतर तो तेथील सहकाऱ्यांशी हात मिळवतो आणि दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर तो बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोअरवर जाऊन लाउंजमध्ये एक कप कॉफीचा आस्वाद घेताना दिसतो. यादरम्यान टॉप फ्लोवरवरून दुबई शहराचे अद्भुत दृश्यसुद्धा दिसत आहे. एकदा बघाच डॉली चहाविक्रेत्याची बुर्ज खलिफाची सफर…

हेही वाचा…स्वयंपाकघरात थंडगार हवेसाठी पट्ठ्याने केला ‘असा’ जुगाड; टेबलावर ठेवला पंखा अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

दुबईतीलच नाही, तर जगातील सर्वांत उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे. या इमारतीत एक तरी घर घेण्याचे स्वप्न अनेक अब्जाधीशांनी बाळगले आहे. तसेच अनेकदा बुर्ज खलिफावर खास क्षणांचे, प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो, तर अनेक चित्रपटांच्या ट्रेलरचेही प्रदर्शन करण्यात येते. आज या बुर्ज खलिफामध्ये जाण्याची संधी नागपूरच्या डॉली चहाविक्रेत्याला मिळाली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @dolly_ki_tapri_nagpur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एक कप कॉफी प्यायला बुर्ज खलिफावर गेलो’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. काही जण ‘आता बुर्ज खलिफावर चहाची टपरी उघड’, असे म्हणत डॉली चहाविक्रेत्याची खिल्ली उडवीत आहेत. तर अनेक जण चहाविक्रेत्याचा हा प्रवास पाहून त्याचे कौतुकही करीत आहेत.