Viral Video: असं म्हणतात जे लोक मनाने समाधानी असतात त्यांना आयुष्यातला आनंद शोधण्यासाठी एखादं लहान कारणही पुरेसं असतं. हल्लीचे लोक अनेक गोष्टी त्यांच्याकडे असूनही ज्या गोष्टी त्यांच्याकडे नाहीत, याचे दुःख मनात साठवतात. पण, आपल्या आधीच्या पिढीतील लोक त्यांच्याकडे असलेल्या लहान लहान गोष्टीतही खूप समाधानी असतात. आयुष्यातील दुःखाला बाजूला सारून चेहऱ्यावर हास्य ठेवणं आताच्या पिढीसाठी खूप कठीण आहे. पण, पूर्वीच्या लोकांसाठी या गोष्टी सहज शक्य आहेत. सोशल मीडियावर विविध वयोगटातील लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, ज्यात एक आजोबा आपल्या नातीबरोबर एका मराठी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत.

हल्ली पारंपरिक वेश, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीची माळ असे कपडे परिधान केलेले काही मोजकेच लोक आपल्याला पाहायला मिळतात. असे कपडे परिधान करणाऱ्या लोकांची पिढी आता हळूहळू हरवत चालली आहे. सोशल मीडियावर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ चर्चेत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजन करणारे तर काही व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारे असतात; तर काही व्हिडीओ पाहून आपल्या मनाला समाधान प्राप्त होते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
a hilarious viral video
Video : “चकली की चकला” भावाने बनवली अशी चकली की बहि‍णीने धू धू धुतले, पाहा बहीण भावाचा मजेशीर व्हिडीओ
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गावातील एका जुन्या घरामध्ये तरुणी तिच्या आजोबांबरोबर मराठी गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. यावेळी सुरुवातीला ते दोघेही साध्या वेशात दिसतात. त्यानंतर तरुणी साडी आणि तिचे आजोबा पारंपरिक वेशात दिसतात. यावेळी ते ‘राणी माझ्या मळ्यामंदी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी तरुणीबरोबर आजोबा जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘माझ्या आईसारखे शूर जगात कोणी नाही…’ लेकराला वाचविण्यासाठी सिंहाबरोबर केला सामना; थरारक VIDEO पाहून फुटेल घाम

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @swapnali.kalange या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर चाळीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

एकाने लिहिलंय की, “आजोबांच्या गळ्यातील तुळशीची माळ सांगते की आजोबाचं घर हे समाधानी आहे”, तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “आजची सगळ्यात सुंदर रील, असंच आनंदी राहा बाबा.” तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “खूपच सुंदर.”

Story img Loader