scorecardresearch

Viral Video: पार्क केलेली गाडी क्षणात झाली गायब; नेमकं काय घडलं पाहा

Viral: गाडी पार्क करताच काही क्षणात झाली गायब; थक्क करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video: पार्क केलेली गाडी क्षणात झाली गायब; नेमकं काय घडलं पाहा
पार्क केलेली गाडी गायब झाल्याचा व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

प्रत्येक गाडीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. गाडी चालवताच नाही तर गाडी पार्क केल्यानंतरही त्याच्या रेंजवर, क्षमतेवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. गाडी पार्क करताना जर व्यवस्थित पार्क केली नाही, तर कदाचित गाडीचे खुप मोठे नुकसान होऊ शकते. याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधुन येत आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक माणूस गाडी पार्क करत असल्याचे दिसत आहे. गाडी पार्क करून हा माणूस गाडीतून बाहेर येतो, तितक्यात अचानक गाडी पुढे जाऊ लागते. अचानक गाडी चालु कशी झाली याचे त्या माणसालाही आश्चर्य वाटते, तो गाडी थांबवण्याचा प्रयत्नही करतो पण गाडी समोर असलेल्या दरीमध्ये पडुन गायब होते. पाहा व्हायरल होणारा व्हिडिओ.

आणखी वाचा: वाघाचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अन्…; थरकाप उडवणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: चिमुकल्याने चक्क माकडांना केले खेळात सहभागी; हा खेळ पाहून नेटकरीही झाले अवाक, पाहा Viral Video

हा व्हायरल व्हिडीओ पाहुन नेटकरीही थक्क झाले आहेत. गाडीला पार्किंग ब्रेक न लावल्याने हा अपघात झाल्याचे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आले आहे. प्रत्येकाने गाडी पार्क करताना आजूबाजूच्या गोष्टींवर, गाडीच्या यंत्रणेवर नीट लक्ष देणे, काळजी घेणे किती आवश्यक आहे हे या व्हिडीओतून स्पष्ट होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 12:58 IST

संबंधित बातम्या