Shocking video: भारताच्या बहुतांश रस्त्यांवर दारू प्यायल्यानंतर गोंधळ निर्माण करणारे लोक अनेक वेळा पाहिले गेले आहेत. दारूच्या नशेत काही लोक सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात; तर काही जण पोलिसांशी हुज्जत घालतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पोलिसांनीच असं कृत्य केलंय की तुम्हालाही धक्का बसेल. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रतिमा मलिन करणारा एक लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. दारुच्या नशेमध्ये एखादी व्यक्ती त्यांच्या कृतींचे परिणाम विचारात न घेता काहीही करू शकते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे ज्यात उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका हवालदाराने रस्त्याच्या मधोमध आपली पँट काढून लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलीस हवालदाराचे लज्जास्पद कृत्य पाहणारे लोकं त्याच्या कृतीने थक्क झाले आणि काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक व्हिडीओ काढत असतानाही पोलीस हवालदाराने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ राज्यातील संपूर्ण पोलीस खात्यासाठी पेच निर्माण करणारा आहे. ही घटना आग्राच्या सदर पोलीस स्टेशन परिसरातील शहीद नगर पोलीस चौकीबाहेर सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. घटनेच्या वेळी कॉन्स्टेबल ऑफ ड्युटीवर असल्याची माहिती आहे. मात्र, तो गणवेश परिधान करून, शूज न घालता रस्त्याच्या मधोमध लघवी करताना दिसत आहे. जवळून वाहने जात असताना आणि लोक व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाही तो रस्त्यावर कोणतीही संकोच न करता लघवी करताना दिसत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे आणि इंटरनेट वापरकर्ते पोलिस कॉन्स्टेबलच्या रस्त्याच्या मध्यभागी आणि जमावासमोर केलेल्या लज्जास्पद कृत्याबद्दल निंदा करत आहेत. बबलू गौतम असे या हवालदाराचे नाव असून तो शहीद नगर पोलीस चौकीत तैनात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिवाशी खेळ कशाला? विषारी सापासोबत डान्स अंगाशी आला; लाइव्ह स्टेजवरच महिलेला कोब्रा डसला

पोलिस कॉन्स्टेबलच्या या लज्जास्पद कृत्याबद्दल पोलीस हवालदारावर कारवाई करण्यात आली असून त्याला तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे. आग्रा पोलिस आयुक्तालयाने सांगितले की, विभागीय चौकशी सुरू आहे. त्यांनी ट्विट केले की, “वरील प्रकरणात, हेड कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे आणि त्याची विभागीय चौकशी केली जात आहे.”

सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि पोलिस कॉन्स्टेबलला त्याच्या कृत्याबद्दल फटकारले. पोलीस हवालदाराच्या या घृणास्पद कृत्याबद्दल त्वरीत आणि कठोर कारवाई करण्याची मागणीही नेटकरी करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “गणवेशाची ताकद… व्यसनी आहे.”

Story img Loader