scorecardresearch

Video: डब्ल्यूडब्ल्यूईमधील ‘या’ प्रसिद्ध सुपरस्टारचा मेकओव्हर पाहिलात का? व्हिडीओ व्हायरल

Viral video: ड्वेन जॉनसनला तुम्ही डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये अनेकांची धुलाई करताना पाहिलं असेल, पण आता समोर आलेल्या व्हिडीओ एकदा पाहाच

Dwayne Johnson
जॉनसनचा मेकओव्हर (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Dwayne Johnson डब्ल्यूडब्ल्यूईमधील सुपरस्टार आणि अभिनेता ड्वेन जॉनसन गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट सृष्टीतल्या पदार्पनामुळे चर्चेत होता. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणानं पुन्हा चर्चेत आला आहे. आतापर्यंत ड्वेन जॉनसनला तुम्ही डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये अनेकांची धुलाई करताना पाहिलं असेल, पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ड्वेन जॉनसनला शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ड्वेन जॉनसनचा मेकओव्हर –

ड्वेन जॉनसने स्वत: हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरन शेअर केला आहे. ड्वेन जॉनसन नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. आता शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाप-लेकीचं प्रेम पाहायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जॉनसन त्याच्या मुलींसोबत खेळत आहे. दरम्यान त्याच्या मुली त्याचा मेकअप करण्यासाठी हट्ट करतात. सुरुवातीला तो माझी मिटींग आहे असं म्हणत नकार देतो, मात्र लेकीच्या हट्टापुढे त्याचं काही चालत नाही. फक्त पाच मिनिटात मेकअप कर म्हणत तो त्यांना परवानगी देतो, मात्र काहीच वेळात मुली त्याचा चेहरा स्केचपेन आणि लिपस्टीकने लालेलाल करुन टाकतात. या व्हिडीओमध्ये ड्वेन जॉनसन एकदम फनी दिसत आहे. दरम्यान या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जॉनसन लिहतो, या मेकअपमुळे आता मला माझी मिटिंग कॅन्सल करावी लागणार आहे कारण हा मेअकप काढण्यासाठी एक तास जाईल.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – प्राणी संग्रहालयातून पळालेला झेब्रा पोहोचला थेट झेब्रा क्रॉसिंगवर; वाचा मग पुढे काय झालं

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला ६० लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तसेच अनेक त्याच्या चाहत्यांनी व्हिडीओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका चाहत्याने जॉनसनने बाळगलेल्या संयमाचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 10:24 IST

संबंधित बातम्या