Elder Women Viral Video : मुंबई लोकलमध्ये तुम्हाला रोज काहीतरी वेगळं बघायला मिळतं. कोणी व्यवसाय तर कोणी शाळेचा अभ्यास करताना दिसतो. इथे भांडणारी, मदत करणारी अगदी तुमचा जीव वाचवणारी आणि वाईट दृष्टीने बघणारी, तर अगदी शांतपणे प्रवासाची मजा घेणारी माणसे तुम्ही मुंबई लोकलच्या प्रवासात अनुभवू शकता. त्यामुळे इथे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या माणसांना भेटू शकता. आज असाच एक निरागस महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये महिलेच्या कृतीने सगळ्यांचे मन जिंकले आहे.

मुंबई लोकलच्या गर्दीच्या डब्यात तोल सांभाळण्यासाठी हँडलला पकडून एक वृद्ध महिला उभी असते. दरम्यान बॅग्राऊंडमध्ये “दिल तो बच्चा है जी” हे लोकप्रिय गाणं वाजत असतं. गाणं सुरू असताना ती महिला दोन्ही हात वर करून हँडल पकडते आणि पार्कमध्ये खेळणाऱ्या मुलांसारखी पुढे-मागे हलत मजा करू लागते आणि पुन्हा दरवाज्याकडे तोंड करून उभी राहते. हा मजेशीर क्षण पाहून आजूबाजूचे प्रवासीही आनंदी होतात.

अनेकदा ट्रेनमध्ये आजूबाजूला खूप प्रवासी असल्यामुळे भूक लागल्यावरही आपण खात नाही, मेकअप करत नाही. सगळे बघतील या भीतीने पण, साडी नेसलेल्या या महिलेने कोणाचीही पर्वा न करता पूर्णपणे रमून, खेळकरपणे झुलत मजा केली. आजूबाजूचे इतर प्रवासी हे पाहतात, तिच्या या अचानक आणि निरागस आनंदामुळे डब्यातील वातावरणही अधिक हलकं आणि आनंदी झाल्यासारखं वाटतं. एकदा बघाच पाहिलेचा हा व्हायरल होणारा हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

mumbai local viral video

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @subarsha07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “मी रोज ऑफिसला जाताना लेडीज डब्यातून प्रवास करते. पण, आज पहिल्यांदाच असं काही पाहिलं. खरंच, वय हे फक्त एक आकडा असतो”, “दिल तो बच्चा है जी”, “या गाण्याने वृद्ध महिलेच्या खेळकर व आनंदी स्वभावाला सुंदरपणे दाखवतो”, “खराखुरं मुंबईकर असंच आयुष्याचा आनंद घेतो” आदी कमेंट्स तर अनेकांनी हृदय आणि टाळ्याचे इमोजी वापरून महिलेचं कौतुक केलं.