viral video elderly couple : चांगला जोडीदार मिळणे, चांगली पत्रिका, स्थळ सांगून येणे नशिबात असावं लागतं असं म्हणतात. कारण – आजकालच्या काळात नातं टिकवणं अत्यंत कठीण झालं आहे. याचे कारण जोडीदाराकडून वाढत चाललेल्या अपेक्षा. ज्यामुळे अनेकांचं नातं काही वर्ष वा महिनेच टिकून राहतं असल्याचं आपण अनेकदा पाहतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही भारावून जाल आणि आपलं नातंही इथपर्यंत टिकावं असं अगदी मनापासून म्हणाल.
हळदीचा कार्यक्रम सुरु असतो. तितक्यात आजोबा त्यांच्या पार्टनरला म्हणजेच आजीला डान्स करण्यासाठी चल म्हणत असतात. पण, आजी नकार देत असते. पण, आजोबा मात्र हट्ट धरून तिचा हात पकडून तिला खुर्चीवरून उठवतात. तितक्यात डीजेवर ‘सामी सामी’ गाणं लागतं. हे गाणं अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील आहे. आजी-आजोबा सगळ्या तरुण मंडळींच्या मधोमध उभं राहून डान्स करण्यास सुरुवात करतात.
“याला म्हणतात खरं प्रेम” (Viral Video )
थोडासा खेळकर स्वभाव, आपल्या मनातले विचार ओळखणारा, घरकामात मदत करणारा, डान्स करता येत नसेल तरी हातात हात घेऊन तो क्षण अगदी खास करणारा एक जोडीदार प्रत्येकालाच हवा असतो आणि हा स्वभाव अगदी म्हातारपणापर्यंत राहावा, असेही कुठेतरी वाटत असते. तर आज हीच इच्छा आजोबांची आजीने पूर्ण केलेली दिसते आहे. आजोबा आणि आजीचा डान्स एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shiv_trekkers या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “याला नशीब लागतं, हे सगळ्यांनाच नाही मिळतं”, “याला म्हणतात खरं प्रेम”, “छान आजोबा”, “किती छान हौशी आहे काका आणि काकू. त्यांना किती छान कंपनी देताय…. दृष्टी न लागो या जोडीला”, “आधी नको नको म्हणणारेच खूप नाचतात”, “वय काहीही असो, असं जगता आलं पाहिजे”, “असा जोडीदार सगळ्यांना मिळावा”, “आनंदी राहण्यासाठी वय महत्वाचं नसतं”, “ह्या वयात बाबा असे आहेत तर जवान असताना ते डेन्जर असतील”, “वाह नाद खुळा. नशीब लागतं असं बघायला मिळायला. खूप लकी कुटूंब आहे हे. नजर नको लागायला खरंच. किती छान संस्कार असतील” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
