Video Shows Elderly Couple Shows How To Make Patravali : विवाह सोहळा, पूजा व इतर कार्यक्रमात तर अगदी पाणी आले नाही की, जेवणासाठी मोठ्या प्रमाणात आपण पेपर प्लेट्स (प्लास्टिकच्या पत्रावळ्या) वापरतो. पण, पेपर प्लेट्स येण्यापूर्वी पळस पानांच्या पत्रावळ्या प्रचंड वापरल्या जायच्या. पण, सध्याच्या काळात काळात या हद्दपार झाल्या आहेत. पण, नक्की या पत्रावळ्या कशा बनवल्या जायच्या तुम्हाला माहिती आहे का? नाही… तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये या पत्रावळ्या कशा बनवल्या जाणार हे दाखवले आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, गावाकडच्या घरात पळसाच्या झाडांची पाने ठेवली आहेत. आजी आणि आजोबा मिळून पानांना धागा आणि दोऱ्याच्या सहाय्याने शिवताना दिसत आहेत; जेणेकरून त्याचा आकार पत्रावळ्या सारखा होईल. तसेच काही पानांचे टोप देखील बनवले आहेत ज्यात लहानपणी तुम्ही सुद्धा करवदं आणि जांभूळ झाडावरून काढून घरी आणले असतील. पळस पानांच्या पत्रावळ्या कशाप्रकारे बनवल्या जातात व्हायरल व्हिडीओतून बघा…

आधुनिक जगामध्ये या कला लुप्त होत गेल्या (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gavakadchi_gosht या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘पूर्वी प्रत्येक गावामध्ये अशा पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या बनवल्या जायच्या पण आधुनिक जगामध्ये या कला लुप्त होत गेल्या… पुढच्या पिढीला अशा जेवणासाठी पत्रावळ्या असायच्या हे कळणारच नाही’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

नेटकरी हा व्हिडीओ पाहून “थोडे वर्षांनी परत माणूस जुन्यावरच येणार आहे थोडं थांबा, जुने दिवस परत येणार”, “या पत्रावळ्यांवरील जेवणाची चव कूठल्याही सोन्या चांदीच्या ताटात मिळत नाही”, “काही लोक बोलत आहेत की जर्मनीतील एका कंपनीने अशा पत्रावळ्या बनवून पर्यावरण पूरक काम केले आहे त्यांना कोण सांगणार की हे आम्ही पाहिल्यापासून करत आहोत”, “प्लास्टिकच्या पिढीला पळसाच्या पानांची पत्रावळी द्रोण दाखवायला पण मिळत नाहीत” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.