Elderly Couple Viral Video : आजच्या काळात, इन्स्टाग्रामवर एखादा व्हिडीओ किंवा फोटो अपलोड केल्यानंतर त्याला किती लाईक्स, व्ह्यूजसाठी आले हे बघण्यासाठी आपण वारंवार इन्स्टाग्राम, फेसबूकवर जातो. लाईक्स कमी आले की, मूड ऑफ होतो आणि व्ह्यूज जास्त आले की, आनंद गगनात मावत नाही आणि आवडीचा फोटो, व्हिडीओ काही क्षणांत नाहीसा होतो. पण, इंटरनेट जगाच्या धावपळीपासून दूर असलेल्या एका वृद्ध जोडप्याने आपल्याला ‘आनंद’ कशात असतो याचा खरा अर्थ समजावून सांगितला आहे.

नातीने वृद्ध जोडप्याच्या @amma_at_65 या अकाऊंटवरून एक व्हिडीओ अपलोड केला होता. पण, त्यांच्या व्हिडीओला फक्त तीन लाईक्स आले. पण, निराश न होता त्यांना या गोष्टीचा आनंद वाटला. व्हिडिओमध्ये तो माणूस आपल्या पत्नीच्या शेजारी उभा राहून हसत म्हणतो, “अरे या व्हिडीओला तीन लोकांनी लाईक केलं”. कॅमेऱ्यामागून एक महिला त्यांचं कौतुक करते. त्यामुळे दोघांनाही खूप आनंद झालेले दिसत आहेत. या व्हिडिओला फक्त ३ लाईक्स मिळाल्याचा आनंद साजरा केला त्यामुळे व्हिडीओने लोकांची मने जिंकली आहेत आणि आता ३ लाईक्स साजरे करणाऱ्या रीलला १७ हजारांहून अधिक लाईक्स आणि १ लाख ८७ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

अनेकदा आपण आनंदाकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याच दुःखात चूर राहण्याचा प्रयत्न करतो. सतत मोठ्या आनंदाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा लहान-सहान गोष्टींतला आनंद आपण कसा घ्यायचा याचे उत्तम उदाहरण हा आजी-आजोबांचा व्हिडीओ आपल्यासमोर घेऊन आला आहे. व्हिडीओला मिळालेल्या ३ लाईक्समध्ये ते समाधानी झाले आणि या समाधानाचे त्यांना फळही मिळाले. त्यांचा व्हिडीओला १७ हजारांहून अधिक लाईक्स आणि १ लाख ८७ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

https://www.instagram.com/reels/DTyQRtNgUMI

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @amma_at_65 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “दुःख कधीच तुमच्या वाटेला येऊ नये”, “अनेकांनी व्हिडीओवर हार्ट इमोजी वापरून प्रतिक्रिया दिल्या”, “व्हिडीओला एक लाइक मिळाल्यावरही मला खूप आनंद होतो”, “आजी तुम्ही असेच हसत राहा. मी तुमचा व्हिडीओ नक्की शेअर करणार” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…