CRPF Jawan Shares Heartwarming Moment : आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी आपण देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. देशाच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान, आर्मी ऑफिसर आणि इतर सुरक्षा दलातील प्रत्येक जवानाचा मोलाचा वाटा आहे. देशसेवेचं कर्तव्य बजावताना जवानांना अनेकदा अनोळखी व्यक्तींकडून मिळणारं प्रेम, आदर आणि आपुलकी मनाला स्पर्शून जाते. असाच एक हृदयस्पर्शी क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका वृद्ध महिलेने कर्तव्यावर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानाला एक छोटीशी भेटवस्तू दिली. या अनपेक्षित भेटीतील आपुलकीचा क्षण सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कर्तव्यावर तैनात असलेल्या एका सीआरपीएफ जवानासाठी हा क्षण खूप खास ठरला. पारंपरिक काश्मिरी पद्धतीचा डोक्यावर स्कार्फ/कापड बांधलेली ही वृद्ध महिला हातात ताजी फळे घेऊन उभी होती. नंतर सीआरपीएफ जवानाला पाहताच ती त्याच्याजवळ जाते जाते त्याला हातातील प्लम (आलूबुखारे) भेट म्हणून त्यांना देते. जवान महिलेने दिलेली भेट हसतमुखाने स्वीकारतो. तिच्या या प्रेमळपणामुळे तो भावूक झालेला दिसतो. हातात फळे घेऊन तो कॅमेऱ्याकडे पाहत काय म्हणतो बघा.

“आपण काश्मीरमध्ये उभे आहोत आणि आई माझ्यासाठी काय घेऊन आल्या आहेत ते पाहा. किती छान आहे. धन्यवाद. मला इतका सन्मान दिल्याबद्दल मनापासून आभार” ( “हम काश्मीर में खडे हैं और माताजी क्या लेके आयी हैं देख लो। कितना अच्छा है। थँक्यू। शुक्रिया। इतना सम्मान के लिए बहुत धन्यवाद) असे हिंदीमध्ये म्हणताना दिसते. त्या दोघांमध्ये काही सविस्तर संभाषण होत नाही, पण कॅमेऱ्यात कैद झालेले ते काही सेकंद खूप काही सांगून जातात. त्या महिलेची साधी भेट आणि जवानाचा हृदयस्पर्शी प्रतिसाद एका सामान्य संवादाला एका विलक्षण हृदयस्पर्शी प्रसंगात बदलून टाकतात.एकदा तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @TheSkandar या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, प्रेक्षक दोघांच्या संवादातील आपुलकीचे कौतुक करत आहेत. अनेक युजर्सनी काश्मीर आणि तेथील लोकांच्या सौंदर्याबद्दल भाष्य केले आणि काहींनी त्या दोन अनोळखी व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या स्नेह आणि आदरावर लक्ष केंद्रित केले. तर कोणी ‘सोशल मीडियावर मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडीओ’ अशी कमेंट सुद्धा एका युजरने केली आहे.